IPL मध्ये दोन नव्या संघांच्या घोषणेनंतर सौरव गांगुलीचा राजीनामा; या एका कारणामुळे सोडले पद…


नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयने आयपीएलच्या २ नवीन संघांची विक्री करून आपली तिजोरी आणखी भरली आहे. लखनऊ आणि अहमदाबादच्या संघांच्या बोलीतून बीसीसीआयला १२७१५ कोटी रुपये मिळाले आहेत, पण यानंतर काही वेळातच बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

सौरव गांगुली यांनी एटीके मोहन बागान फुटबॉल संघाच्या संचालकपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. एटीके मोहन बागान आरपीएसजी (RPSG) च्या मालकीचे आहे, ज्यांनी आयपीएलमध्ये लखनऊ फ्रँचायझी विकत घेतली आहे. हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी सौरव गांगुली यांनी मोहन बागान सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय आणि मोहन बागान दोन्हीकडे महत्वाची पदे भूषविताना न्याय काम करणे कठीण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेत असल्याचे गांगुली यांनी सांगितले. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, सौरव गांगुली यांनी मोहन बागानमधील त्याच्या भूमिकेतून पायउतार होण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मोहन बागान हा भारतीय फुटबॉलमधील दोन सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय क्लबपैकी एक आहे. तसेच तो इंडियन सुपर लीगचाही एक भाग आहे. सौरव गांगुली हे मोहन बागानचे संचालक आहेत आणि त्यांच्याकडे या टीमचे शेअर्सही आहेत. गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी कायम राहण्यापर्यंत मोहन बागानमधील त्यांच्या भूमिकेतून पायउतार होणार आहेत. म्हणजे बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गांगुली पुन्हा मोहन बागानमध्ये सामील होणार आहेत.

बीसीसीआयला अब्जावधींचा नफा
आयपीएलच्या २ नवीन संघांची घोषणा करण्यात आल्यामुळे २०२२ पासून आयपीएलमध्ये ८ ऐवजी १० संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील. आयपीएल बोलीमध्ये ऐतिहासिक बोली लावत आरपीएसजीने लखनऊच्या संघ विकत घेतला आहे. आरपीएसजी ग्रुप कोलकाताचे उद्योगपती संजीव गोएंका यांनी लखनऊ फ्रँचायझी ७,०९० कोटी रुपयांना विकत घेतली आहे. त्याचवेळी सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबादचा संघ ५,६२५ कोटी रुपयांना विकत घेतला आहे. सीव्हीसी कॅपिटल या कंपनीची सट्टेबाजी करणाऱ्या कंपनीत गुंतवणूक असल्याचेही आता समोर आले आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: