VIDEO: भाजप मंत्र्यांनं पंतप्रधान मोदींना दिली ‘परमात्म्या’ची उपमा!


हायलाइट्स:

  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२
  • वादग्रस्त वक्तव्यांचा सिलसिला सुरू
  • भाजप नेते आणि मंत्री उपेंद्र तिवारी पुन्हा चर्चेत

हरदोई, उत्तर प्रदेश : आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात अडकणारे उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री उपेंद्र तिवारी पुन्हा एकदा चर्चेत आलेत. यावेळी, उपेंद्र तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट ‘परमात्म्या’ची उपमा दिल्यानं ते चर्चेत आहेत.

नरेंद्र मोदी यांच्यासारखा महापुरुष धरतीवर एकदाच दाखल होतो, असं उपेंद्र तिवारी यांचं म्हणणं आहे. मंगळवारी तिवारी हरदोईमध्ये एका स्वच्छता कार्यक्रमात सहभागी झाले होते. इथेच त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

‘नरेंद्र मोदी हे काही साधारण व्यक्ती नाहीत तर ते साक्षात परमात्म्याचं रुप आहेत. पंतप्रधान नाही तर प्रधानसेवकाच्या रुपात ते आपल्यासोबत काम करण्यासाठी दाखल झाले आहेत’ असं वक्तव्य यावेळी उपेंद्र तिवारी यांनी केलं.

Malana Fire: रात्री सर्व गाढ झोपेत असताना हिमाचलच्या कुशीतील ‘मलाणा’ गावात अग्नितांडव, ४० घरं भस्मसात
tamil nadu fire : फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; सहा जणांचा मृत्यू , ९ जण जखमी

यापूर्वीही, इंधनांच्या दरवाढीसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिवारी चर्चेत आले होते. ‘आजकाल केवळ मूठभर लोक पेट्रोल – डिझेलचा वापर करतात. देशातले ९५ टक्के लोक पेट्रोल – डिझेलचा वापर करत नाहीत. पेट्रोल – डिझेलच्या किंमतीत वाढ झालेली नाही तर सामान्य व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ झालीय’ असं म्हणत तिवारी यांनी महागाईनं होरपळणाऱ्या जनतेचा रोष ओढावून घेतला होता.

lakhimpur kheri case : लखीमपूर हिंसाचारावर CM योगी आदित्यनाथ यांनी दिली प्रतिक्रिया, बोलले…
Aryan Khan Case: आर्यन खानचे तिसरे वकील; मुकुल रोहतगींच्या खांद्यावर जामिनाची जबाबदारी…Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: