आजच्या काळात हे कसले पोपट जन्मले?; राज्यपालांचा रोख कोणाकडे?


हायलाइट्स:

  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अहमदनगरमध्ये
  • प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटलचे केले भूमिपूजन
  • जाहीर भाषणात राज्यपालांची तुफान फटकेबाजी

अहमदनगर: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रवरानगर येथे प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटलचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी आयुर्वेद आणि योगाचे महत्व विशद करताना चरक यांनी पाळलेल्या एका पोपटाची गोष्ट सांगितली. ‘चांगल्या आरोग्यासाठी गैरमार्गाने नव्हे तर कष्टाने कमावलेले खा, असे तो पोपट सांगत असे. आजच्या काळात मात्र हे कसले पोपट जन्मले आहेत, काय माहिती? असा टोला त्यांनी लगावला. राज्यपालांनी सांगितलेल्या या पोपटाच्या गोष्टीनंतर चांगलचा हंशा पिकला.

आपल्या भाषणात राज्यपालांनी चरक यांच्या पोपटाची गोष्ट सांगितली. ‘एकदा एक व्यक्ती चरक यांच्याकडे गेली. चांगल्या आरोग्यसाठी काय करावे, असा सल्ला विचारल्यावर चरक यांनी हे आपल्या पोपटला विचारा, असे सांगितले. त्या व्यक्तीने पोपटला विचारले. पोपटाने त्यांना सल्ला दिला की, चांगल्या स्वास्थ्यासाठी हित भूक, मित भूक आणि रित भूक महत्वाची आहे. म्हणजे चांगले आणि पचेल तेच खा, थोडे आणि योग्य तेवढचे खावे आणि गैरमार्गाने नव्हे तर कष्टाने कमावलेले खावे, असा सल्ला त्या पोपटाने दिला.’ गोष्ट सांगून झाल्यावर राज्यपाल म्हणाले, ‘असे पोपट त्या काळात होते. आजच्या काळात हे कसले पोपट जन्मलेत काय माहिती?’ असे सांगण्यामागे त्यांचा रोख कोणाकडे होता, यावरून चर्चा सुरू झाली.
आपल्या भाषणात राज्यपालांनी आयुर्वेद आणि योगाचे महत्व विषद केले. ते म्हणाले,’आज जगात वैद्यक शास्त्र अत्याधुनिक होत आहे. तरीही आयुर्वेदावरील विश्वास कायम आहे. अमेरिकेतील संस्थांमधून आयुर्वेद शिकविला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा योग दिन साजरा करण्याची घोषणा केली. जगातील अनेक देशांनी ती स्वीकारली. आपल्या देशात आयुष्य मंत्रालय आणि जनऔषधी या महत्वपूर्ण गोष्टी मोदींनी सुरू केल्या.’

वाचा: ‘फडणवीसांना खंडणीखोराची वकिली करावी लागतेय, त्यांचं हे अध:पतन बघवत नाही’

प्रवरा परिसराचे त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले, ‘मोजता येणार नाहीत एवढी शिक्षणाची केंद्र या संस्थेत आहेत. प्रवरेच्या काठी अतिशय रम्य असा परिसर आहे. वृद्धापकाळात येथेच येऊन रहावे, असे वाटते आहे. अशा संस्थेने आयुर्वेदासाठी घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे. राजकीय क्षेत्रात काम करताना लोक टीका करत असतात. मात्र, त्यासोबत सामाजिक कार्याची जोड असेल तर पिढ्यानपिढ्या तुम्ही लोकांसोबत राहू शकता. विखे कुटुंब याचेच उदाहरण आहे.’ असेही राज्यपाल म्हणाले.

वाचा: फडणवीसांच्या योजनेला क्लीन चिट मिळताच भाजप आक्रमक; चित्रा वाघ म्हणाल्या…

प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या प्रवरा अभिमत विद्यापीठाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रवरा आयुर्वेद महाविद्यालयाचे भूमिपूजन आणि डॉ. बाळासाहेब विखे पाटील रिसर्च फाऊंडेशनचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील, पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे यावेळी उपस्थित होते.

वाचा: ‘क्रूझवरील ड्रग्ज पार्टीत नाचणारा ‘तो’ दाढीवाला कोण? NCB नं खुलासा करावा’Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: