Tripura: ‘विहिंप’च्या रॅली दरम्यान मशीद, घरांची तोडफोड; दुकानं पेटवली


हायलाइट्स:

  • उत्तर त्रिपुरातील चमटिल्ली भागातील घटना
  • विश्व हिंदू परिषदेकडून रॅलीचं आयोजन
  • मशिद, घरं, दुकानांची तोडफोड

आगरतळा : उत्तर त्रिपुरा जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी विश्व हिंदू परिषदेकडून एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅली दरम्यान असामाजिक तत्त्वांनी एका मशिदीची तोडफोड केली. तसंच काही घरांची तोडफोड करून, दोन दुकानंही पेटवून दिल्याचं समोर येतंय.

चमटिल्ला भागात ही घटना घडल्याचं समोर येतंय. विश्व हिंदू परिषदेकडून बांगलादेशात होत असलेल्या हिंदुंविरोधी हिंसाचाराविरोधात एका रॅलीचं आयोजन केलं होतं.

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक भानुपाडा चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील रोवा बाजारात कथितरित्या अल्पसंख्यांक समुदायाच्या तीन घरांची आणि काही दुकानांची तोडफोड केली गेली तर दोन दुकानं आगीच्या हवाली करण्यात आली.

VIDEO: भाजप मंत्र्यांनं पंतप्रधान मोदींना दिली ‘परमात्म्या’ची उपमा!
Malana Fire: रात्री सर्व गाढ झोपेत असताना हिमाचलच्या कुशीतील ‘मलाणा’ गावात अग्नितांडव, ४० घरं भस्मसात
विश्व हिंदू परिषदेनं काढलेल्या रॅलीदरम्यान काही असमाजिक तत्त्वांनी चमटिल्ला भागात दगडफेक केली. तसंच एका मशिदीतही तोडफोड करण्यात आली. सुरक्षा दलानं वेळीच घटनास्थळी दाखल होत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं या घटनेची तीव्र निंदा केलीय. पीडितांना योग्य ती नुकसान भरपाई मिळण्याची मागणी माकपाकडून करण्यात आलीय.

दुसरीकडे, भाजप प्रवक्ते नबेंदू भट्टाचार्य यांनी मात्र या घटनेबद्दल कानावर हात ठेवले. आपल्याला या घटनेबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं. सोबतच, अशी काही घटना घडली असेल तर पोलिसांद्वारे योग्य ती कारवाई सुरू केली जायला हवी, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

Chattisgarh: सरकारी कार्यालयात घुसून आमदाराची गुंडागर्दी, कर्मचाऱ्याचा डोळा फोडला
tamil nadu fire : फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; सहा जणांचा मृत्यू , ९ जण जखमीSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: