अमेरिका: मॉलमध्ये गोळीबार; हल्लेखोरासह तीन ठार, चार जखमीवॉशिंग्टन: अमेरिकेतील इदाहो राज्यातील बोइस शहरात सोमवारी झाला. हल्लेखोराच्या गोळीबारात दोन जण ठार झाले. तर, एका पोलिसासह चारजण जखमी झाले होते. पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोर जखमी झाला. मात्र, मंगळवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

गोळीबाराच्या घटनेनंतर शॉपिंग मॉल रिकामे करण्यात आले. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले. हल्लखोरोचे नाव जेकब बर्गक्विस्ट (२७) असे होते. मंगळवारी सकाळी या हल्लेखोराचा मृत्यू झाला.

बोइस पोलिसांना सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मॉलमध्ये गोळीबार झाल्याची माहिती देणारा फोन आला. गोळीबार करणारी श्वेतवर्णीय व्यक्तीकडे काही बंदुका आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोर मॉलमधून पळून जात असताना पोलिसांसोबत चकमक झाली. हल्लेखोराने रस्त्यावरील रहदारीवरही गोळीबार केला. या हल्ल्यात एका कारमध्ये असलेल्या ६८ वर्षीय महिला जखमी झाली.

गोळीबारात जखमी झालेल्या रॉबर्टो पाडिला अर्गुएल्स (४९) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर, जो एकर या २६ वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. जो एकर ही मॉलमध्ये सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करत होती. हल्लेखोराला रोखण्याच्या प्रयत्नात तिचा मृत्यू झाला असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: