भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या संरक्षण मंत्री


टोरंटो: कॅनडाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांच्याकडे आली आहे. अनिता आनंद या जस्टिन ट्रुडो यांच्या पक्षातील महत्त्वाच्या नेत्या आहेत. आनंद यांच्याआधी कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी भारतीय वंशाच्या हरजीत सज्जन यांच्याकडे होती. अनिता आनंद यांचा भर लष्करातील सुधारणेवर अधिक असणार असल्याचे म्हटले जात आहे.

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल केले आहेत. त्यानुसार आता हरजीत सज्जन यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी असणार आहे. सज्जन यांना लष्करातील व्याभिचाराचे प्रकरण हाताळण्यास अपयश आले होते. त्यामुळे त्यांच्याकडून संरक्षण खात्याची जबाबदारी काढली असल्याचे म्हटले जात आहे.

४० लाख लोकसंख्या आणि फक्त ६ करोनाबाधित; तरी संपूर्ण शहरात लॉकडाऊन!

कोण आहेत अनिता आनंद?

अनिता आनंद यांचा जन्म १९६७ मध्ये स्कोटियामध्ये झाला. त्यांचे आई-वडील भारतीय असून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. अनिता आनंद यांची आई सरोज या मूळच्या पंजाब, तर वडील एस. व्ही. आनंद तामिळनाडूचे आहेत. अनिता यांनी टोरंटो विद्यापीठात कायदा विषयाच्या प्राध्यापिका म्हणून काम केले आहे. टोरंटोजवळील ओकव्हिलेमधून २०१९ रोजी खासदारकीसाठी निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांना सार्वजनिक सेवा संबंधीच्या खात्याची जबाबदारी देण्यात आली.

बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधात हिंसाचार; ६८३ जणांना अटक, मुख्य आरोपीकडून गुन्ह्याची कबुली
एअर इंडियाच्या कनिष्क विमानात २३ जून १९८५ रोजी खलिस्तानवाद्यांनी स्फोट घडवून आणला होता. यामध्ये ३२९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील तपास आयोगाला अनिता आनंद यांनी मदत केली होती.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: