सरकारद्वारे ओबीसी आरक्षणाबाबत कोणतेच आदेश नाहीत; ‘या’ निवडणुका स्थगित


हायलाइट्स:

  • जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आणि पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी होणाऱ्या निवडणुकांना जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती.
  • राज्य सरकारद्वारे ओबीसी आरक्षणाबाबत कोणतेच आदेश प्राप्त झालेले नाहीत म्हणून घेतला निर्णय.
  • राज्य सरकारचे आदेश मिळताच निवडणुकीचा सुधारित आदेश काढण्यात येणार आहे.

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आणि पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी होणाऱ्या निवडणुकांना जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली आहे. राज्य सरकारद्वारे ओबीसी आरक्षणाबाबत कोणतेच आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शनासाठी पाठपुरावा केला जात असून तूर्त या पदांसाठीच्या निवडणुकांना जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली आहे. ( postponed due to no order from the government regarding obc reservation)

पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी २८ ऑक्टोबरला आणि जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी २९ ऑक्टोबरला निवडणुका होणार होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तसे आदेश काढण्यात आले होते. परंतु जिल्हाधिकारी आर. विमला यांनी मंगळवारी काढलेल्या आदेशांनुसार ह्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. अद्याप या निवडणुकांबाबत राज्य सरकारने आदेश दिलेले नाहीत. ते मिळताच निवडणुकीचा सुधारित आदेश काढण्यात येईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा- अशी अडकली गुजरातची ‘हेल्मेट गँग’ अहमदनगर पोलिसांच्या जाळ्यात

आता उपाध्यक्षपदासाठीची निवडणूक ही निव्वळ औपचारिकता
दरम्यान, पोटनिवडणुकांनंतर आता जिल्हा परिषदेत परत एकदा काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. ५८ पैकी ३२ सदस्य काँग्रेसचे असून त्यात १७ महिला आहेत. त्यामुळे उपाध्यक्षपदासाठीची निवडणूक ही निव्वळ औपचारिकता आहे. मंत्री सुनील केदारांचे ग्रामीण काँग्रेसवरील वर्चस्व लक्षात घेता हे पद त्यांच्याच मर्जीनुसार जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. माजी उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे यांची या पदी वर्णी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

क्लिक करा आणि वाचा- काल दिलासा, आज चिंता! राज्यात करोनाचे आज हजारावर नवे रुग्ण, मृत्यूसंख्येतही वाढ
क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानला उद्या जामीन मिळणार का?; मुकुल रोहतगींनी कोर्टात मांडले हे महत्वाचे १० मुद्देSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: