दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय; तब्बल २० रेल्वे गाड्या झाल्या रद्द


हायलाइट्स:

  • ब्लॉक असल्याने अनेक रेल्वे गाड्या रद्द
  • प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागणार
  • हजारो प्रवाशांची गैरसोय होणार

अमरावती : अमरावती शहराजवळील बडनेरा रेल्वे जंक्शन इथं गुडस वॅगन रिपेअर डेपो लाईनच्या कामानिमित्त ब्लॉक असल्याने अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्याात आल्या आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर तब्बल २० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागणार आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र याच काळात बडनेरा रेल्वे डेपोच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलं आहे.

रत्नागिरीत राजकीय खळबळ: शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; राष्ट्रवादी प्रवेशाची तयारी?

कोणत्या रेल्वे गाड्या होणार रद्द?

ब्लॉकमुळे २९ ऑक्टोबर आणि ३० ऑक्टोबर रोजी धावणारी मुंबई-अमरावती एक्‍सप्रेस, याच तारखेला धावणारी अमरावती-मुंबई एक्‍सप्रेस, २७ ऑक्टोबरची पुणे-अमरावती एक्‍सप्रेस, २८ ऑक्टोबरची अमरावती-पुणे एक्‍सप्रेस, २९ ऑक्टोबर आणि ३० ऑक्टोबरची नागपूर- सीएसएमटी एक्‍सप्रेस, २९ ऑक्टोबर आणि ३० ऑक्टोबरची सीएसएमटी-नागपूर एक्‍सप्रेस, २८ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबरची सीएसएमटी-नागपूर एक्सप्रेस, २८ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबरची नागपूर-सीएसएमटी एक्‍सप्रेस, ३० ऑक्टोबरची पुणे – नागपूर एक्‍सप्रेस, २९ ऑक्टोबरची नागपूर-पुणे एक्‍सप्रेस, २८ ऑक्टोबरची पुणे-नागपूर एक्‍सप्रेस आणि २९ ऑक्टोबरची नागपूर-पुणे एक्‍सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान, या गाड्या रद्द झाल्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होणार आहे. या प्रवाशांना आता एसटी बसचा किंवा खासगी वाहतुकीचा उपयोग करावा लागणार आहेत. ऐन दिवाळीच्या दिवाळीचा तोंडावर होणाऱ्या या गैरसोयीमुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: