दुसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी; आदित्य बिर्ला सनलाईफ एएमसीला १७३ कोटींचा नफा


हायलाइट्स:

  • आदित्य बिर्ला सनलाईफ असेट मॅनेजमेंट (AMC) कंपनीला दुसऱ्या तिमाहीत १७३.१ कोटींचा नफा झाला आहे.
  • २०२०-२१ मधील सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला १२५.४ कोटींचा नफा झाला होता.
  • कंपनीने ५.६० रुपये प्रती शेअर लाभांश घोषीत केला आहे.

मुंबई : आदित्य बिर्ला सनलाईफ असेट मॅनेजमेंट (AMC) कंपनीला दुसऱ्या तिमाहीत १७३.१ कोटींचा नफा झाला आहे. एक वर्षापूर्वी याच तिमाहीच्या तुलनेत नफ्यात ३८ टक्के वाढ झाली. २०२०-२१ मधील सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला १२५.४ कोटींचा नफा झाला होता.

कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार कंपनीचा परिचालन महसूल ३० टक्क्यांनी वाढला असून तो ३३२ कोटी इतका झाला. कंपनीने ५.६० रुपये प्रती शेअर लाभांश घोषीत केला आहे.

नामांकित ग्लोबल कंपन्यामध्ये गुंतवणूक संधी; बिर्ला म्युच्युअल फंडाने सादर केली ‘ही’ योजना
आदित्य बिर्ला सनलाईफ असेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालासुब्रमणियम म्हणाले की आम्ही सातत्याने एकूण व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. यासाठी वेगवेगळ्या मालमत्ता श्रेणी आम्ही वाढवत आहोत. एसआयपीमध्ये सातत्याने वृद्धी होत आहे. इक्विटी एयूएम, बी-३० (टॉप ३० शहरांपलीकडील शहरे) फोलिओंची संख्या आणि वैविध्यपूर्ण उत्पादने आमच्या विकासात महत्वाचे योगदान देत आहेत.

शेअर बाजारातल्या तेजीचं गारुड! सात महिन्यात एक कोटी नव्या गुंतवणूकदारांचे सीमोल्लंघन
याच महिन्यात बिर्ला असेट मॅनेजमेंट कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली होती. शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी ही चौथी म्युच्युअल फंड कंपनी आहे. व्यवस्थापनांतर्गत मालमत्तेनुसार देखील ही चौथ्या क्रमांकाची कंपनी आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या म्युच्युअल फंडाच्या सरासरी मालमत्तेत (AUM) वार्षिक आधारावर २६ टक्के वृद्धी झाली आणि तो ३ लाख कोटी रुपयांवर गेला. इक्विटी AUM ४१ टक्क्यांनी वाढून तो १.१६ लाख कोटी इतका झाला आहे.

सराफा बाजारात तेजी; सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले, जाणून घ्या भाव
कंपनीने म्हटलं आहे की त्यांच्याकडे दुसऱ्या तिमाहीत ७३ लाख फोलिओ होते. त्या आधीच्या पहिल्या सहामाहीत ५.९५ लाख नवीन फोलिओ जोडले. मासिक आधारावर कंपनीची एसआयपीमधून येणारी गुंतवणूक रक्कम ८६६ कोटी रुपये होती. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने ३.२० लाख नवीन एसआयपी खाती सुरु केली. वार्षिक आधारावर यात ११० टक्के वाढ झाली.

कंपनीने म्हटलं आहे की टॉप ३० शहरांपलीकडील शहरांमध्ये (बी-३० मार्केट) त्यांची मासिक सरासरी AUM वार्षिक आधारावर २३ टक्क्यांनी वाढली आहे. बिर्ला असेट मॅनेजमेंटने म्हटलं आहे की चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत त्यांनी केलेल्या एकूण व्यवहारांपैकी जवळपास ८४ टक्के व्यवहार डिजिटल व्यासपीठावरून झाले. ७७ टक्के नवीन फोलिओंना डिजिटल माध्यमातून सुरु करण्यात आले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: