४० लाख लोकसंख्या आणि फक्त ६ करोनाबाधित; तरी संपूर्ण शहरात लॉकडाऊन!


बीजिंग: चीनने ४० लाख लोकसंख्या असलेल्या लांझोउ शहरात करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अतिआवश्यकता असल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे प्रशासनाने संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर करोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. संसर्गाची बाधा असलेल्या नागरिकांना विलगीकरणात ठेवले जात आहे. काही दिवसांपूर्वीच बीजिंगमध्ये संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी हॉटेलमध्ये बुकींग घेण्यास बंदी घातली होती.

२४ तासांत फक्त सहा बाधित

चीनमध्ये सध्याचा करोना संसर्गाचा वेग हा भारतासह इतर देशांच्या तुलनेत अधिक कमी आहे. त्यानंतरही खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मागील २४ तासांत चीनमध्ये २९ करोनाबाधित आढळले. तर, लांझोउमध्ये फक्त सहा करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यानंतरही या भागात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

चीनमध्ये पुन्हा करोना उद्रेक?; बाधितांची संख्या वाढण्याची भीती
चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले की, लांझोउ शहरात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. सर्व नागरिकांना घरातच थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. करोना चाचणी जेवढ्या अधिक होतील, तेवढ्या वेगाने बाधित आढळण्याची शक्यता अधिक असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले.

चीनमध्ये पुन्हा करोनाचा उद्रेक; शाळा बंद, विमान सेवा स्थगित
राजधानी बीजिंगमध्येही बाधित

राजधानी बीजिंगने शून्य करोनाबाधित संख्या गाठली होती. आता मात्र, करोनाबाधितांची संख्या ९ झाली आहे. त्यानंतर आता प्रशासनाने पुन्हा एकदा सर्व नागरिकांची करोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. पर्यटकांवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: