नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत सुरू होता धक्कादायक प्रकार; पोलिसांनी धाड टाकताच…


हायलाइट्स:

  • लॉकडाउन संपताच ‘हा’ व्यवसायही सुरू
  • नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता धक्कादायक प्रकार
  • पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली

अहमदनगरः लॉकडाउनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत होत असताना अवैध धंदेही पुन्हा जोर धरू लागल्याचे दिसून येत आहे. नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर शहरात दोन ठिकाणी छापा टाकून अवैध व्यवसाय करणाऱ्या तिघांना अटक केली आणि तीन महिलांची सुटका केली.

डीवायएसपी मिटके यांच्या पथकाला शहरातील उपनगरांत सुरू असलेल्या या अवैध व्यवसायाची माहिती मिळाली होती. सावेडीतील वाणीनगर आणि केडगावमधील अंबिकानगरमध्ये चांगल्या वस्तीत फ्लॅट भाड्याने घेऊन तेथे परप्रांतीय महिलांना आणले होते. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी एकाच वेळी दोन्ही ठिकाणी छापे टाकले. सावेडीत टाकण्यात आलेल्या छाप्यात दीपक एकनाथ लांडगे व सागर जाधव यांना अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून एका महिलेची सुटका करण्यात आली. केडगावमधील छाप्यात योगेश पोपट ओव्हाळ (रा. माळीवाडा अहमदनगर ) याला अटक करण्यात आली. तेथून दोन महिलांची सुटका करण्यात आली. या आरोपींविरूद्ध महिलांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यातील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

एनसीबी अधिकाऱ्याच्या ‘त्या’ निनावी पत्रावर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया

पोलिसांना संशय येऊ नये म्हणून उपनगरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, पोलिस निरीक्षक संपत शिंदे, ज्योती गडकरी, समाधान सोळंकी, राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, अमोल शिरसाट, चेतन मोहिते, गौतम सातपुते, सचिन जाधव, जयश्री सुद्रिक, प्रियंका भिंगरदिवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

एनसीबी अधिकाऱ्याच्या ‘त्या’ पत्राची चौकशी होणार?; अधिकारी म्हणतात….

नगर शहर आणि जिल्ह्यातही असे अवैध व्यवसाय पूर्वीपासून चालतात. अधूनमधून पोलिसांची कारवाई होते. लॉकडाउनच्या काळात मात्र हे व्यवसाय बऱ्यापैकी बंद झाले होते. आता ते पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांना कारवाईत सातत्य ठेवण्याची गरज आहे. पूर्वी विशिष्ट भागात चालणारे हे व्यवसाय आता उपनगरातही दिसून येऊ लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.

प्रभाकर साईलनं पैशांसाठी समीर वानखेडेंवर आरोप केले?; भाजपने केले स्टिंग ऑपरेशनSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: