sameer wankhede : समीर वानखेडेंची दोन तास झाली चौकशी; NCB मुख्यालयातून बाहेर पडले


नवी दिल्लीः मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची विभागीय संचालक समीर वानखेडे ( sameer wankhede ) यांची दिल्लीतील NCB च्या मुख्यालयात जवळपास २ ताच चौकशी झाली. दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या चौकशीनंतर समीर वानखेडे हे एनसीबीच्या मुख्यालयातून बाहेर पडले आहेत.

क्रूझवरील अंमली पदार्थाच्या छाप्या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा अटकेत आहे. आर्यन खानच्या सुटकेसाठी समीर वानखेडे यांना ८ कोटी देण्यात येणार होते, अशा आरोप या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने केला आहे. या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी समीर वानखेडे यांची ही चौकशी करण्यात आली आहे.

kiran gosavi : फरार किरण गोसावीची कोंडी; लखनऊ पोलिसांचा नकार, तर पुणे पोलिसांचं पथक रवाना

दरम्यान, आपण कोणालाही चौकशीसाठी बोलावलेलं नाही. समीर वानखेडेंची चौकशी करायची असती तर त्यांना आपण बोलावलं असतं, असं एनसीबीचे उपमहासंचालक ग्यानेश्वर सिंह यांनी तासाभरापूर्वी सांगितलं.

aryan khan case : दिल्लीत दाखल होताच समीर वानखेडे म्हणाले….Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: