शेअर बाजारातल्या तेजीचं गारुड! सात महिन्यात एक कोटी नव्या गुंतवणूकदारांचे सीमोल्लंघन


हायलाइट्स:

  • शेअर बाजारातील तेजीने सामान्यांमध्ये कुतूहल निर्माण केले आहे.
  • मागील काही महिन्यात डिमॅट खाते सुरु करणाऱ्या नवख्या गुंतवणूकदारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.
  • एनएसईवरील गुंतवणूदारांमध्ये सर्वाधिक गुंतवणूकदार महाराष्ट्रातील आहेत.

मुंबई : शेअर बाजारात दररोज होणाऱ्या नवनव्या विक्रमांनी भारवलेल्या सामन्यांमध्ये बाजाराविषयी आकर्षण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम नव्या गुंतवणूकदारांच्या संख्येत झालेल्या प्रचंड वाढीतून दिसून आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात सोमवारी वैयक्तिक गुंतवणूकदारांची संख्या पाच कोटींवर गेली. त्यातील एक कोटी गुंतवणूकदारांनी मागील सात महिन्यात बाजारात गुंतवणुकीचा श्रीगणेशा केला. एनएसईवरील गुंतवणूदारांमध्ये सर्वाधिक गुंतवणूकदार महाराष्ट्रातील आहेत.

तुमचं आधार कार्ड कुठे-कुठे वापरलंय; घरबसल्या तपासा ही महत्वाची माहिती, कशी ते जाणून घ्या
एक्सचेंजसोबत रजिस्टर्ड युनिक क्लाइंट कोड ८ कोटी ८६ लाख इतके वाढले आहेत.सरकार, SEBI आणि सर्व स्टॉकहोल्डर्सतर्फे देण्यात आलेले प्रोडक्ट, थेट ग्राहक ऑनबोर्डिंग प्रोसेस, इन्वेस्टर एज्युकेशन आणि जागरूकता या सर्वांचा हा संमिश्र परिणाम असल्याचे एनएससीचे एमडी आणि सीईओ विक्रम लिमये यांनी सांगितले.

ICICI बँंकेच्या शेअरमध्ये मोठी वाढ; गाठला रेकॉर्ड स्तर, हे आहे त्यामागचे कारण
लिमये म्हणाले की, ३ कोटी रजिस्टर्ड गुंतवणूकदारांवरून ४ कोटींपर्यंतचा टप्पा १५ महिन्यात पार झाला होता. त्यानंतरचे एक कोटी गुंतवणूकदार अवघ्या ७ महिन्याहून कमी कालावधीत राष्ट्रीय शेअर बाजाराशी जोडले गेले आहेत. त्यामुळे ‘एनएससी’ने ५ कोटी गुंतवणूकदारांचा आकडा पार केला आहे.

खासगीकरणाचा धडाका; केंद्र सरकार करणार १३ एअरपोर्ट्सची विक्री, प्रक्रियेला आला वेग
एकूण गुंतवणूकदारांपैकी महाराष्ट्राचा सर्वाधिक १७ टक्के वाटा आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश १० टक्के आणि गुजरात ७ टक्के इतके आहेत. उत्तरेतील राज्यांनी एनएससीवर नवीन गुंतवणूकदारांमध्ये ३६ टक्क्यांचे योगदान दिले आहे. पश्चिमेच्या राज्यांमध्ये ३१ टक्के, दक्षिणेच्या राज्यांमद्ये ३० आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये १३ टक्के लोकांची हिस्सेदारी असल्याचे एनएसईने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. CDSL आणि NSDL या दोन डिपॉजिटरीकडे एकूण ७.०२ कोटी डिमॅट अकाउंट आहेत.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: