सर्वात घातक पदार्पण; टी-२० वर्ल्डकपमध्ये झाला आजवरचा सर्वात मोठा विक्रम


अबुधाबी: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील ग्रुप बी मधील सर्वात धोकादायक संघ कोणता असेल तर तो म्हणजे अफगाणिस्तान होय. वर्ल्डकपमधील पहिल्याच लढती त्यांनी धमाकेदार विजय मिळवला. स्कॉटलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने तब्बल १३० धावांनी विजय मिळवाल. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताने ४ बाद १९० धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर घातक गोलंदाजी करत स्कॉटलंडचा फक्त ६० धावांवर ऑल आउट केला.

वाचा-T20 World Cup: पुढच्या सर्व लढती करो वा मरो, टीम इंडियात मोठे बदल; पाहा कोणाला मिळू

सोमवारी झालेल्या लढतीत अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू मुजीब उर रहमान आणि स्टार फिरकीपटू राशिद खान यांनी कमाल केली. पण सर्वात खास दिवस ठरला तो मुजीब साठी त्यांने पदार्पणाच्या सामन्यात मोठा विक्रम केला. टी-२० वर्ल्डकपमध्ये पदार्पणात अफगाणिस्तानकडून त्याने चार षटकात ५ विकेट घेतल्या. टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात पाच विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज आहे. मुजीबने पहिल्याच सामन्यात ५ विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. मुजीबने ज्या पाच विकेट घेतल्या त्यापैकी ३ या बोल्ड होत्या तर दोन LBW याचा अर्थ या पाचही विकेट घेण्यात फिल्डरचा कोणताही सहभाग नव्हता. मुजीबची गोलंदाजी इतकी घातक ठरली की, स्कॉटलंडची अवस्था शून्य बाद २७ वरून ३ बाद २८ अशी झाली.

वाचा- ज्याची भीती वाटत होती तेच भारतीय संघासोबत झाले; आताच उपाय शोधला नाही तर…


आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये पाच विकेट घेणारा तो अफगाणिस्तानचा सर्वात युवा तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा युवा गोलंदाज ठरला आहे. मुजीबचे वय २० वर्ष २११ दिवस आहे. बांगलादेशच्या मुस्तफिजुर रहमान याने २० वर्ष २०२ दिवशी टी-२० वर्ल्डकपमध्ये पाच विकेट घेतल्या होत्या. तर नेदर्लंडच्या अहसान मलिकने २४ वर्ष २१०व्या दिवशी अशी कामगिरी केली होती.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: