Video: मला गर्भपात करण्यास भाग पाडले; पाक कर्णधार बाबरवर खळबळजनक आरोप


इस्लामाबाद: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या चर्चेत आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला. वर्ल्डकपच्या इतिहासात पाकिस्तानचा हा भारताविरुद्धचा पहिला विजय आहे. बाबर गेल्या काही वर्षात त्याच्या फलंदाजीमुळे चर्चेत आला असला तरी आणखी एका कारणामुळे तो चर्चेत असतो. वैयक्तीक आयुष्यात बाबरवर फार गंभीर आरोप झाले आहेत. बाबरची गर्लफ्रेंड हमीजा मुख्तारने असा दावा केला आहेकी त्याने लग्नाचे आमिष दाखवून शोषण केले. इतक नव्हे तर हमीजाने ती बाबरच्या मुलाची आई होणार होती असा देखील गौप्यस्फोट केला.

वाचा-सर्वात घातक पदार्पण; टी-२० वर्ल्डकपमध्ये झाला आजवरचा सर्वात मोठा विक्रम

पाकिस्तानमधील वृत्तपत्र डेली पाकिस्तानने दिलेल्या वृत्तानुसार हमीजाने बाबर आझमविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी हमीजा मुख्तारने असा दावा केला होती की बाबरच्या कुटुंबीयांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख रुपये देण्याची ऑफर दिली होती. बाबरकडून ही ऑफर अशा वेळेला आली आहे जेव्हा धमकी आणि शोषणाचा खटला लाहोर उच्च न्यायालयात सुरू आहे. हमीजाच्या दाव्यानुसार बाबर आणि ती एकत्र शिकत होते.

वाचा-T20 World Cup: पुढच्या सर्व लढती करो वा मरो, टीम इंडियात मोठे बदल; पाहा कोणाला मिळू

हमीजाने बाबरवर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या दाव्यानुसार बाबरने फक्त शोषण केले नाही तर आर्थिक फसवणूक देखील केली आहे. मी आणि बाबर प्रेमात होतो. २०११ साली तो घरातून पळून आला होता. तेव्हा आम्ही दोघे लाहोरमध्ये एकत्र राहत होतो. यासाठी हमीजाने अनेक पुरावे देखील दिले आहेत. पवित्र कुराण हातात घेऊन हमीजाने सांगितले की, २०११ साली लग्न करण्यासाठी मी घरातून पळून आले होते. पण बाबरच्या कुटुंबीयांनी हा दावा फेटाळून लावला. बाबर मला मित्रांच्या घरी नेले. तेथे आम्ही काही दिवस एकत्र राहिलो. बाबर सोबत लग्न करायचे होते म्हणून मी घरातून दोन लाख रुपयांचे दागिने चोरल्याचा दावा तिने केला. बाबरसाठी मी माझी गाडी विकली आणि १२ लाख रुपये दिल्याचे तिने म्हटले.

वाचा- ज्याची भीती वाटत होती तेच भारतीय संघासोबत झाले; आताच उपाय शोधला नाही तर…

बाबरला पैसे दिल्यानंतर देखील तो माझ्याशी भांडण करायचा. त्यानंतर मी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. मी त्याच्या मुलाची आई होणार होते पण मला गर्भपात करण्यास भाग पाडले, असा धक्कादायक आरोप देखी हमीजाने केलाय.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: