…म्हणून अल्पवयीन मुलानेच केला बापाचा खून; ८ महिन्यांनंतर झाला खुलासा


हायलाइट्स:

  • खून प्रकरणात आठ महिन्यांनंतर धक्कादायक खुलासा
  • मुलानेच जन्मदात्या वडिलांचा साडीने गळा आवळला
  • तब्बल आठ महिन्यानंतर गुन्ह्याची उकल

हिंगोली : जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या एका खून प्रकरणात आठ महिन्यांनंतर धक्कादायक खुलासा झाला आहे. अल्पवयीन मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा साडीने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वडील अतिप्रमाणात मद्य प्राशन करत असल्यामुळे व आईला घरात वारंवार त्रास देत असल्याचा मनात राग धरून अल्पवयीन मुलानेच जन्मदात्या वडिलांचा गळा आवळल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल आठ महिन्यानंतर या गुन्ह्याची उकल झाली आहे.

खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू; अँटॉप हिलच्या सीजीएस काॅलनीतील घटना

घरातील इतर लोकांची दिशाभूल करण्यासाठी वडिलांनी गळफास घेतला असा बनाव करण्यात आला होता. पिंटू महादू घोंगडे ( वय ३८ वर्ष ) असं मयताचं नाव आहे, तर शिवम पिंटू घोंगडे (वय १५ वर्ष ) असं आरोपीचं नाव आहे.

दरम्यान, पोलीस नाईक बालाजी जोगदंड यांच्या तक्रारीवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: