New Rate Of Bio Waste: जैव कचऱ्याच्या नव्या दरास रुग्णालयांचा विरोध; अखेर मुद्दा हायकोर्टात


हायलाइट्स:

  • शहरातील खासगी रुग्णालयांमधील जैव कचरा संकलनाबाबतचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात.
  • जैव कचरा संकलन १०० रुपये प्रतिकिलोने करण्याला विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचा विरोध.
  • शहरातील काही रुग्णालयांनी दरवाढीला विरोध केल्याने कचऱ्याचे संकलन बंद.

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

शहरातील खासगी रुग्णालयांमधील जैव कचरा संकलनाबाबतचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे. जैव कचरा संकलन ३० रुपये प्रतिकिलोने नाही तर १०० रुपये प्रतिकिलोने करावे या निर्णयाविरुद्ध विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनने न्यायालयात धाव घेतली आहे. (the issue of new rate of bio waste has reached the high court)

इंडियन मेडीकल असोसिएशन आणि एक मेसस सूपर्ब हायजीन डिस्पोजल लिमिटेड यांच्यात २००४मध्ये करार झाला होता. त्यानुसार जैव कचऱ्याच्या संकलनासाठी ३० रुपये प्रतिकिलो हा दर निश्चित करण्यात आला होता. मात्र पुढे त्यानुसार या दरात वृद्धी होत गेली. २०१९मध्ये मनपानेसुद्धा नवे परिपत्रक काढले. आता हे दर १०० रुपये प्रतिकिलो पर्यंत पोहोचलेत. शहरातील काही रुग्णालयांनी याला विरोध केला असल्याने तेथील कचऱ्याचे संकलन बंद करण्यात आले आहे. असोसिएशने याचा विरोध करीत ही याचिका दाखल केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- त्या डान्सबारमध्ये सुरू होते आक्षेपार्ह अवस्थेत नृत्य, पोलिसांनी छापा टाकला आणि…

दाखल झालेल्या याचिकेनुसार केंद्रीय मंत्रालयाने याबाबत काही सूचना दिल्या आहेत. कोणत्या रुग्णालयातून दर महिन्याला किती जैव कचरा संकलित व्हावा अशा अनेक सूचना त्यात आहेत. यात दराबाबतसुद्धा काही सूचना देण्यात आल्या आहेत. असोसिएशनने याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत अनेकदा पाठपुरावा केला. मात्र त्याचा फायदा न झाल्याने अखेर असोसिएशने न्यायालयात धाव घेतली आहे.

क्लिक करा आणि वाचा- खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू; अँटॉप हिलच्या सीजीएस काॅलनीतील घटना
क्लिक करा आणि वाचा- राज्याला मोठा दिलासा; आज करोना रुग्णसंख्येची निचांकी घट; मृत्यूही घटलेSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: