Video : ‘पाकिस्तानविरुद्ध आपण हरणार’; महेंद्रसिंह धोनीची भविष्यवाणी खरी ठरली


मुंबई : टी-२० विश्वचषकातील हाय होल्टेज सामना रविवारी पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघाने भारताचा १० विकेटने पराभव केला. विश्वचषकात पहिल्यांदाच पराभूत होण्याची नामुष्की भारतीय संघावर ओढवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून अनेक चाहते खेळाडूंवर निशाणा साधत आहेत. कुणी पाकिस्तान संघाचं कौतुक करत आहे, तर कुणी भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजी सपशेल अपयशी ठरल्याने निराश झाले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या अपयशाबद्दल जो तो आपापली मते व्यक्त करत आहे. पण कधी ना कधी भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागणार, अशी भविष्यवाणी याआधीच करण्यात आली होती.

वाचा- Video: हा तर इस्लामचा हिंदूंवरील विजय; पाकिस्तान गृहमंत्र्यांचे द्वेष पसरवणारे वक्तव्य

ही भविष्यवाणी दुसरं-तिसरं कुणी नाही तर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केली होती. सध्या सोशल मीडियात धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. भारतीय संघ एक दिवस पाकिस्तान विरुद्ध पराभूत होईल, असं धोनीने म्हटले होते. ते आज खरे झाले आहे. २०१६च्या टी-२० विश्वचषकादरम्यानचा हा व्हिडिओ आहे.

वाचा- Video : रिस्पेक्ट! इतिहास रचल्यानंतर धोनीपुढे हाथ बांधून उभे राहिले पाकिस्तानी खेळाडू

तत्कालीन संघाचा कर्णधार असलेल्या धोनी आण त्याच्या संघ सहकाऱ्यांनी पाकिस्तान संघाला पराभूत केले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत धोनी म्हणाला होता की, ‘जर आपण पाकिस्तानविरुद्ध ११-० ने जिंकलो आहोत, याचा तुम्हाला अभिमान वाटत असेल, तर कधी ना कधी आपण हरणार हेही वास्तव असेल. तुम्ही आज हरलात, १० वर्षांनी हरलात, २० वर्षांनी हरलात किंवा ५० वर्षांनी हरलात… कधीतरी भारतीय संघ पराभूत होईल. असे नाही की तुम्ही नेहमी जिंकत राहाल.’

वाचा- पाकिस्तानी पत्रकाराचा प्रश्न ऐकून, विराटच्या तळपायाची आग मस्तकात गेली; पाहा Video

दारुण पराभवानंतर कोहली म्हणाला…

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर म्हणाला की, ‘सामना हातातून कसा गेला आणि कुठे चूक झाली हे आम्हाला माहीत आहे. आमच्याकडे त्याबाबत पूर्ण स्पष्टता आहे, एक संघ म्हणून आपण कुठे चुकलो, हे जाणून घेणे चांगले आहे. त्यामुळे तुम्ही काम करू शकता आणि त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू शकता आणि पुढे जाऊ शकता. कारण आमच्याकडे या स्पर्धेत अजूनही बरेच सामने आहेत. जर आपण आपल्या कार्यपद्धतींचे पालन केले, तर आपण निश्चितपणे या चुकांवर मात करू शकतो.’Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: