राष्ट्रवादीत जो मान मिळायचा, तो आता मिळतोय का?; आव्हाडांचा गणेश नाईकांना टोला


हायलाइट्स:

  • नवी मुंबईत पार पडला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा
  • जयंत पाटील यांनी केलं मार्गदर्शन
  • मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांची गणेश नाईकांवर टीका

नवी मुंबई: ‘जे गेले त्यांच्यासाठी अश्रू ढाळून काही अर्थ नाही. आपण समोर असलेल्या परिस्थितीचा सामना करायचा आहे आणि जिद्दीने पुन्हा हे शहर राष्ट्रवादीमय करायचं आहे,’ असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज केला. नवी मुंबईत झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली.

जयंत पाटील यांनी सुरुवातीला मेळाव्यास मार्गदर्शन केलं. ‘अचानक येऊन पडलेल्या जबाबदारीमुळं आपल्या सर्वांना कायम अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुणीही पक्ष सोडून गेला तरी पक्ष कार्यकर्ता कायम पक्षासोबत उभा राहतो हे आपण मागच्या कालखंडात अनुभवायला मिळालं आहे. त्यामुळं संघटना मजबूत करा, प्रत्येक कार्यकर्त्याला बळ द्या. मला खात्री हे शहर पवारसाहेबांच्या विचारांवरच विश्वास टाकेल,’ असं जयंत पाटील म्हणाले.

वाचा: संजय राऊतांवर भुजबळ नाराज; म्हणाले, पवार साहेबांशी बोलावं लागेल!

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जो मान मिळत होता, तो आता मिळतोय का? इथला प्रत्येक निर्णय स्थानिक नेत्यांना विचारात घेऊन व्हायचा. मात्र, आता दिल्ली म्हणेल तेच होईल. कोणताही मान नाही. काळ आणि वेळ पाहून लोक बदलत असतात, त्याप्रमाणे २०१९ साली अनेक लोक पक्ष सोडून गेले. पवार साहेबांना सोडून अनेक जण गद्दार झाले. सर्वाधिक गद्दारी नवी मुंबईतील नेत्याने केली. या लोकांना पवार साहेबांनी बाजूची खुर्ची दिली, पण पक्ष सोडताना त्यांनी याची जाण ठेवली नाही, असा टोला आव्हाड यांनी हाणला.

वाचा: समीर वानखेडेंवर आरोप; जयंत पाटील यांच्या ‘या’ विधानामुळं चर्चेला उधाण

‘भाजपनं देशाची परिस्थिती बदलून टाकली आहे, आज महागाई प्रचंड वाढली आहे. घर कसं चालवायचं याचा अनुभव नसल्यानं महागाई वाढवली जात आहे. महागाईची सर्वाधिक झळ ही महिला वर्गाला बसली आहे. त्यामुळं महिलांनी संघर्षाला सुरुवात करायला पाहिजे,’ असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: