sameer wankhede : समीर वानखेडे दिल्लीला रवाना, अटक टाळण्यासाठी मुंबईतून बदली होणार?


नवी दिल्लीः नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे ( sameer wankhede ) अडचणीत आले आहेत. अंमली पदार्थ प्रकरणी क्रूझवर टाकेलल्या छाप्यावरून वानखेडेंवर एका साक्षीदाराने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आर्यन खानच्या ( Aryan Khan Case ) सुटकेसाठी कोट्यवधींची डील झाल्याचा आरोप या प्रकरणातील साक्षीदाराने केला आहे. या महाराष्ट्राचे अल्पसंख्या मंत्री नवाब मलिक यांनीही वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसंच एसआयटी नेमून चौकशीची मागणी केली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची आज संध्याकाळी बैठक झाली. आता या प्रकरणावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा असा नवा वाद रंगण्याची चिन्ह आहेत.

अंमली पदार्थ प्रकरणी क्रूझवर छापा टाकल्यानंतर या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल याने समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. २५ कोटींची डील झाली होती आणि समीर वानखेडेंना ८ कोटी देण्यात येणार होते, असा आरोप प्रभाकर साईलने केला आहे. समीर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळून लावला आहेत. पण भ्रष्टाचाराच्या होत असलेल्या आरोपांमुळे समीर वानखेडे यांनी खात्यांतर्गत चौकशी होणार आहे. दिल्लीतील एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्यासह दोन निरीक्षक अशा तीन सदस्यांच्या पथकाकडून वानखेडेंची चौकशी केली जाणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

sameer wankhede : समीर वानखेडेंना झटका! चौकशी होणार, दिल्लीतील अधिकारी येणार, सूत्रांची माहिती

समीर वानखेडेंच्या खात्यांतर्गत चौकशीसाठी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक उद्या मुंबईत येणार असल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडे, समीर वानखेडे हे आज दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. समीर वानखेडे हे दिल्ली वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचं बोललं जातंय. याशिवाय समीर वानखेडेंची यांची मुंबईतून बदली करण्यात येणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. मुंबई पोलिसांकडून समीर वानखेडेंना अटक करण्यात येण्याची शक्यता आहे. ही अटक टाळण्यासाठी समीर वानखेडेंची बदली केली जाऊ शकते, असं बोललं जातंय. आता समीर वानखेडे दिल्लीत पोहोचल्यावर काय करणार आणि ते काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अनिल देशमुख क्लीन चिट प्रकरण; ‘त्या’ सीबीआय अधिकाऱ्याचा जामीन फेटाळलाSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: