mahakal in ujjain : पत्नीची शेवटची इच्छा! इंजीनिअरने महाकालच्या चरणी अर्पण केले १७ लाखांचे दागिने


उज्जैनः उज्जैनमध्ये एका इंजीनिअरने आपल्या पत्नीचे १७ लाखांचे दागिने महाकालच्या चरणी अर्पण केले. पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी इंजीनिअरने हे दागिने अर्पण केले. झारखंडमधील बोकारो येथील इंजीनिअर संजीव कुमार हे आई सूरज प्यारीसोबत महाकालेश्वर मंदिरात पोहोचले आणि त्यांनी दिवंगत पत्नी रश्मी प्रभा यांचे १७ लाख रुपयांचे दागिने मंदिर समितीला दिले, अशी माहिती महाकालेश्वर मंदिर समितीचे सहाय्यक प्रशासक मूलचंद जुनवाल यांनी दिली. इंजीनिअर संजीव कुमार यांची पत्नी महाकालची भक्त होती. भगवान महाकालचे आशीर्वाद घेण्यासाठी त्या दरवर्षी उज्जैनला यायच्या. रश्मी प्रभा या गेल्या महिन्याभरापासून आजारी होत्या. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असं इंजीनिअर संजीव कुमार यांनी मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं.

भगवान महाकाल यांच्या चरणी आपले सर्व दागिने अर्पण करावे, अशी शेवटची इच्छा रश्मी यांनी पती संजीव कुमार यांच्याकडे व्यक्त केली होती. संजीव कुमार यांनी पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे. त्यांनी भगवान महाकाल यांच्या चर्णी ३१० ग्रॅम सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. त्यात १ तोळ्याचा सोन्याचा हार, हार छोटा १ नग, १ जपमाळ, २ बांगड्या, २ कंगन, ४ जोडी कानातले टॉप्स, १ कुंडल आणि एका अंगठीचा समावेश आहे. यावेळी एएसपी अमरेंद्र सिंह, सहाय्यक प्रशासक पोर्णिमा सिंघी, मूलचंद जुनवाल, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आर. पी. गेहलोत हे उपस्थित होते.

sameer wankhede : समीर वानखेडेंना झटका! चौकशी होणार, दिल्लीतील अधिकारी येणार, सूत्रांची माहिती

आधी दागिने अर्पण केले आणि मग प्रसाद घेतला

इंजीनिअर आईसोबत मंदिर समिती कार्यालयात पोहोचले होते. तिथे त्यांना प्रसाद दिला गेला. पण दागिने अर्पण केल्यानंतरच अन्न, पाणी किंवा प्रसाद घेऊ, असं ते इंजीनिअर म्हणाले. महाकाल मंदिर समितीचे प्रशासक गणेशकुमार धाकड यांनी ही माहिती दिली.

Himachal Pradesh: बर्फवृष्टीनंतर किन्नौरमध्ये मोठी दुर्घटना, महाराष्ट्रातील तीन ट्रेकर्सचा मृत्यू

पत्नी स्वर्गीय रश्मी प्रभा ही भगवान महाकालाची भक्त होती. यामुळे भगवान महाकालना आपले आवडते दागिने अर्पण करण्यासाठी ती अनेक वेळा बोलली होती. यानुसार आपण पत्नीची इच्छा पूर्ण केली आहे, असं संजीवकुमार यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: