Video: ‘या’ विचित्र कारणासाठी भरकार्यक्रमात राज्यपालांच्या कानशिलात लगावली


तेहरान: इराणमध्ये एका व्यक्तीने भर कार्यक्रमात एका राज्यपालाच्या कानशिलात लगावली. या कृत्यामागेच कारणही विचित्र आहे. कानशिलात लगावणाऱ्याच्या पत्नीला एका पुरुष डॉक्टराने करोना लस दिली होती. या रागातून त्याने हे कृत्य केले असल्याचे म्हटले जात आहे.

वृत्तानुसार, अबेदिन खोर्रम (Abedin Khorram) हे पूर्व अजरबैझान प्रांताचे राज्यपाल आहेत. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात उद्घाटनाचे भाषण करण्यासाठी उभे राहिले होते. त्यावेळीच एक व्यक्ती व्यासपीठावर रागाने आला आणि भाषण देत असलेल्या राज्यपालांना मारहाण केली. कानशिलात लगावणारी व्यक्ती ही याआधी सशस्त्र दलात कार्यरत होती. सध्या तो एक स्थानिक नेता आहे.

कानशिलात का लगावली?

एका पुरुष डॉक्टराने पत्नीला करोना लस दिल्याने ही व्यक्ती नाराज होती. त्यामुळे त्याने थेट राज्यपालाना मारहाण केली. हा हल्ला झाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तात्काळ या हल्लेखोराला ताब्यात घेतले आणि व्यासपीठापासून दूर केले. या घटनेमुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला होता.

तुर्कीचा मोठा निर्णय; अमेरिका, फ्रान्स, जर्मनीच्या राजदूतांवर केली कारवाई

मेक्सिकोमध्ये भारतीय महिलेची हत्या; वाढदिवसानिमित्त होती परदेशात

राज्यपालांवर झालेला हल्ला कॅमेऱ्यात कैद झाला. पोडियमवर असलेल्या माइकमध्येही कानशिलात लगावल्याचा आवाज आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: