INDvsPAK : विश्वचषकात भारताविरुद्ध पहिल्यांदाच जिंकल्यानंतर पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा


इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतावर विजय मिळवल्याबद्दल पाकिस्तान संघाचे अभिनंदन केले आहे. रविवारी (२४ ऑक्टोबर) दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. यासोबतच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनीही संघाच्या उत्कृष्ट खेळाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

वाचा-T20 World Cup: पुढच्या सर्व लढती करो वा मरो, टीम इंडियात मोठे बदल; पाहा कोणाला मिळू शकतो डच्चू

सुपर-१२ च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी झालेल्या १२ सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली होती.

वाचा- पाकिस्तानने बिघडवलं भारताचं गणित; उपांत्य फेरी गाठणे अवघड

१९९२च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार इम्रान खान यांनी ट्विट केले की, ”पाकिस्तान संघाचे आणि विशेषत: बाबर आझमचे अभिनंदन, ज्याने संघाचे नेतृत्व केले. तसेच रिझवान आणि शाहीन आफ्रिदी यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन. देशाला तुमचा अभिमान आहे.”

वाचा-Video : ‘पाकिस्तानविरुद्ध आपण हरणार’; महेंद्रसिंह धोनीची भविष्यवाणी खरी ठरली

नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष बनलेले रमीझ राजा यांनीही संघाच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. रमीझ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘अलहमदुलिल्लाह… हा पहिला विजय आहे, सर्वात आश्चर्यकारक, पण आता प्रवास सुरू झाला आहे, हे लक्षात ठेवा. सर्व पाकिस्तानींसाठी अभिमानाचा क्षण आणि आनंद लुटण्यासाठी हा क्षण दिलेल्या खेळाडूंचे आभार.’

वाचा-पराभवाचा झटक्यानंतर टीम इंडियाचे टेन्शन वाढले; हा खेळाडू रुग्णालयात

दरम्यान, पाकिस्तानने विश्वचषकात भारताविरुद्धची पराभवाची मालिका खंडित करत रविवारी पहिला विजय मिळवला. नाणेफेक जिंकून पाक कर्णधार बाबर आझमने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला ७ बाद १५१ धावांवर रोखले. यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीने कोणतीही चूक न करता लक्ष्याचा पाठलाग केला. कर्णधार बाबरने नाबाद ६८ आणि रिझवानने ७९ धावा केल्या. पाकिस्तानने १३ चेंडू शिल्लक राखत सामना जिंकला.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: