Supreme Court: एक कोटी रुपये जमा केल्यानंतर कार्ति चिदंबरम यांना परदेशी जाण्याची परवानगी


हायलाइट्स:

  • सर्वोच्च न्यायालयानं दिली परवानगी
  • सुरक्षा ठेव म्हणून एक कोटी रुपये भरावे लागणार
  • कार्ति चिदंबरम यांचा वर्षातला दुसरा परदेशी दौरा

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा आणि आयएनएक्स मीडिया प्रकरणातील आरोपी कार्ति चिदंबरम यांना २५ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबरपर्यंत परदेशी जाण्यासाठी सशर्त परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिलीय. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये एक कोटी रुपये जमा केल्यानंतर कार्ति चिदंबरम यांना रिसतर परवानगी दिली जाणार आहे.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसर, कार्ति चिदंबरम यांच्याकडून चौकशीत सहकार्य मिळालेलं नाही. तसंच चौकशीसाठी जारी करण्यात आलेल्या नोटिशीनंतरही ते हजर राहिलेले नाहीत. या बाबींवर निश्चितच विचार केला जाईल, असं यावेळी कोर्टानं म्हटलंय.

Fuel Price: ‘लसीकरणाची शंभरी झाली, आता इंधनांची शंभरीही साजरी करा’
Himachal Pradesh: बर्फवृष्टीनंतर किन्नौरमध्ये मोठी दुर्घटना, महाराष्ट्रातील तीन ट्रेकर्सचा मृत्यू

कार्ति चिदंबरम यांच्याविरोधातील गुन्हेगारी प्रकरणात सीबीआय आणि अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी सुरू आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात विदेशी गुंतवणूक संवर्द्धन बोर्डाच्या मंजुरीशी संबंधित एका प्रकरणासहीत इतरही अनेक बाबी तपासल्या जात आहेत.

आयएनएक्स मीडियाला परदेशातून ३०५ कोटी रुपयांचं निधी प्राप्त करण्यासाठी विदेशी गुंतवणूक संवर्द्धन बोर्डाची मंजुरी मिळाली तेव्हा कार्ति चिदंबरम यांचे पिता पी चिदंबरम हे अर्थमंत्री होते.

या अगोदर, फेब्रुवारी २०२१ मध्येही कार्ति चिदंबरम यांना रजिस्ट्रीमध्ये दोन कोटी रुपये सुरक्षा ठेव म्हणून जमा केल्यानंतर परदेशी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. कार्ति ज्या देशात जाणार आहेत आणि जिथे थांबणार आहेत, त्याची माहिती अगोदरच देतील, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले होते.

Ind Vs Pak: पाकिस्तानविरुद्ध भारताचा पराभव, हॉस्टेलमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला
Madhay Pradesh: अभिनेता बॉबी देओलला धुंडाळत बजरंग दलाचा ‘आश्रम’च्या सेटवर हल्लाSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: