मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी शरद पवार; निवडणुकीत एकतर्फी विजय!


हायलाइट्स:

  • मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदाची निवडणूक
  • शरद पवार यांचा मोठ्या फरकाने विजय
  • पवार यांना २९ तर धनंजय शिंदे यांना २ मते

मुंबई : शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज रविवारी पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.

शरद पवार यांच्याविरोधात ग्रंथालय बचाव समितीचे धनंजय शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र ३४ जणांपैकी ३१ जणांनी या निवडणुकीत मतदान केलं असून शरद पवार यांना २९ तर धनंजय शिंदे यांना २ मते मिळाली आहेत.

आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार का? शिवसेना नेत्याने दिली प्रतिक्रिया

उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण, वास्तुविशादर शशी प्रभू, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरविंद सावंत, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर तसंच प्रदीप कर्णिक, प्रभाकर नारकर, अमला नेवाळकर हे सात जण निवडून आले आहेत.

उपाध्यक्षपदाच्या सात जागांसाठी १४ उमेदवार होते. संतोष कदम, डॉ. रजनी जाधव, आनंद प्रभू, प्रमोद खानोलकर, झुंजार पाटील, डॉ. संजय भिडे, सुधीर सावंत हे उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्पर्धेत होते.

दरम्यान, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीआधी रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक चर्चेत आली होती. ग्रंथालय बचाव समितीच्या धनंजय शिंदे यांनी शरद पवार यांच्याविरोधात अनेक आरोप केले होते. मात्र अखेर या निवडणुकीत शरद पवार यांनी एकतर्फी विजय साकारला आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: