‘शाहरुख खान भाजपमध्ये गेला तर कोकेन नाही, पीठीसाखर सापडली म्हणून सांगतील’


हायलाइट्स:

  • आर्यन खानच्या अटकेवरुन राजकारण तापलं
  • भाजप नेत्यांचा महाविकास आघाडीवर निशाणा
  • छगन भुजबळ यांचा भाजपला टोला

बीडः बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan)याचा मुलगा आर्यन खान (aryan khan) कोर्डिलिया क्रूझ अमली पदार्थ प्रकरणात ३ ऑक्टोबरपासून अटकेत आहे. आर्यन खानच्या अटकेवरुन राज्यात वातावरण तापलं आहे. राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी व भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. यावार राज्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी एक खोचक टोला लगावला आहे.

सध्या कोणावरही धाडी सुरू आहेत. शाहरुख खान उद्या भाजपमध्ये गेल्यावर तिथे कोकेन नाही तर पीठीसाखर सापडले असे म्हणतील, असा खोचक टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे. तसंच, सध्या संपूर्ण बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू आहे, असंही ते म्हणाले आहेत.

मुंद्रा बंदरावर तीस हजार ड्रग्ज सापडलं त्याच नावसुद्ध नाही. ते तर बंदर आहे. त्याची चौकशी नाही. पण शाहरुख खानच्या घरामध्ये घुसले. संपूर्ण बॉलिवूडला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. रोज कोणाच्या तरी घरी धाडी पडतात. अजित दादांच्या बहिणींच्या घरी धाडी पडतात. हे सगळं पाहिल्यांनतर वाईट वाटतं की काय चाललंय, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे.

वाचाः भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या मंचावर; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रत्येक पातळ्यांवर लढत आहोत. विरोधक मात्र विरोधाला विरोध करायचा म्हणून आंदोलने उभी करत आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनाचे देखील आम्ही स्वागत करतो मात्र ओबीसी आरक्षणासाठी इथे जन जागरण करण्यापेक्षा ओबीसी समाजाला घटनात्मक आरक्षण मिळावे यासाठी दिल्ली सरकार समोर जागरण घाला, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

वाचाःसमीर वानखेडेंची नोकरी जातेय की मलिकांचे मंत्रिपद ते पाहूया; केंद्रीय मंत्र्यांची टोलेबाजी

निवडणुका जवळ आल्या की भाजपचे ओबीसी प्रेम जागे होते मात्र ओबीसी आरक्षणाच्या विरोधात भाजपाचेच लोक कोर्टात जातात भाजपाचे राहुल रमेश वाघ ,भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस हे अध्यादेशाच्या विरुद्ध कोर्टात गेले आहेत अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. बीड जिल्ह्यात विशेषतः परळी मध्ये जेंव्हा आलो तेंव्हा माझें जंगी स्वागत करण्यात आले या जनतेचे प्रेम पाहून मी भारावून गेलो. या प्रेमाचा उतराई कसा होऊ हे कळत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: