Sanjay Raut: ‘तुमचं सरकार घालवल्यापासून आम्हालाही शांत झोप लागतेय’


हायलाइट्स:

  • तुमचं सरकार घालवल्यापासून आम्हालाही शांत झोप लागतेय.
  • संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना हाणला सणसणीत टोला.
  • हर्षवर्धन पाटील खरं बोलले, बहुतेक ते नशेमध्ये नसावेत!

नाशिक:शिवसेना नेते संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून आज झालेल्या मेळाव्यात राऊत यांनी भाजपवर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. ‘तुमचं सरकार घालवल्यापासून आम्हालाही शांत झोप लागत आहे. महाराष्ट्रातलं तुमचं सरकार आम्ही घालवलं आहे आणि आता आमचं पुढचं लक्ष्य दिल्ली आहे’, असं विधान राऊत यांनी केलं. ( Sanjay Raut Vs Bjp Latest News )

वाचा:‘समीर वानखेडे यांच्या विरोधात बोलाल तर…’; नवाब मलिक यांना धमकीचा फोन

संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवरून भाजप आणि भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केलं. ‘भाजपमध्ये आल्यापासून निवांत झोप लागते’, या हर्षवर्धन पाटलांच्या विधानावरून राऊत यांनी टोला हाणला. ‘हर्षवर्धन पाटील खरे बोलत आहेत. बहुतेक ते नशेमध्ये नसावेत किंवा त्यांना गांजा मिळाला नसेल. खरंतर आम्हालाही तुमचं सरकार घालवल्यापासून शांत झोप लागत आहे आणि सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटील आणि इतर भाजप नेत्यांना मात्र सध्या झोप लागत नाहीय’, असा टोलाही राऊत यांनी हाणला.

वाचा: महाविकास आघाडीविरुद्ध भाजपचं षडयंत्र, नेत्यांची बैठक झाली!; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात यापुढे फक्त शिवसेनेचाच सूर तळपत राहणार आहे, असे सांगताना हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवून दाखवा, असे आव्हानच राऊत यांनी दिले. गेल्या दोन वर्षांपासून सरकार पाडण्याची भाषा करत आहेत पण त्यात यश आले नाही. हीच काय पुढची पाच वर्षेदेखील आमचीच सत्ता राज्यात राहणार आहे, असे राऊत यांनी ठणकावले. येत्या काळात आपल्याला पक्ष भक्कम करायचा आहे. विधानसभा निवडणुकांसाठी आपल्याला आतापासून रणनीती आखावी लागणार आहे. विधानसभेत आपले किमान शंभर आमदार असले पाहिजेत, असे आवाहनही राऊत यांनी केले.

वाचा: मलिक-वानखेडे वाद: उज्ज्वल निकम यांनी दिला ‘हा’ धोक्याचा इशारा

भारताने शंभर कोटी लसचा टप्पा पूर्ण केला आहे. त्याचा जल्लोष सुरू असताना राऊत यांनी पुन्हा एकदा त्यावर आक्षेप घेतला. १०० कोटी लस दिल्याची माहिती खोटी आहे. प्रत्यक्षात फक्त २३ कोटी नागरिकांनाच लस दिली गेली आहे. मी हे पुराव्यांनिशी सिद्ध करेन, असे आव्हानच राऊत यांनी दिले. भाजपचा नाशिकमधील एक नगरसेवक आज शिवसेनेत दाखल झाला आहे. ही फक्त सुरुवात आहे. कालपासून १७ ते १८ जण मला भेटून गेले आहेत, असा दावा करत नाशिक महापालिकेवर आता भगवाच फडकेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

शरद पवार हे नरेंद्र मोदींचे गुरू आहेत: संजय राऊत

वाचा: परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा सापडला? ‘या’ शहरात असल्याचा संशयSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: