इंधन भडका ; आज पुन्हा महागले पेट्रोल आणि डिझेल, जाणून घ्या आजचा भाव


हायलाइट्स:

  • पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ केली.
  • आज पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेल ३५ पैशांनी महागले.
  • मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११३.४६ रुपये झाला आहे.

मुंबई : जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या भाव ८५ डॉलरवर गेला आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ केली. आज पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेल ३५ पैशांनी महागले.

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११३.४६ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०७.५९ रुपये इतके वाढले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०४.५२ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०८.११ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११६.२६ रुपये असून बंगळुरात पेट्रोल १११.३४ रुपये झाले आहे.

‘ही’ विदेशी बँक खरेदी करण्याची शर्यत; HDFC, अॅक्सिस, कोटक महिंद्रा यांमध्ये जोरदार स्पर्धा
आज डिझेल ३५ पैशांनी महागले आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव १०४.३८ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ९६.३२ रुपये इतका वाढला आहे. चेन्नईत १००.५९ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९९.४३ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०५.६४ रुपये असून बंगळुरात डिझेल १०२.२३ रुपये झाला आहे.

महागाईबाबत आरबीआय गंभीर; गव्हर्नर म्हणतात, ‘४ टक्क्यांचं उद्दिष्ट गाठावंच लागेल’
ऑक्टोबरमध्ये पेट्रोल ६.४० रुपयांनी महागले आहे तर मागील २४ दिवसांत डिझेल ७.७० रुपयांनी महागले आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेल दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये तफावत झपाट्याने कमी होत आहे. चालू आठवड्यात ब्रेंट क्रूडचा भाव ०.९२ डॉलरने वधारून ८५.५३ डॉलर प्रती बॅरल झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.०९ डॉलरने वधारून ८२.५० डॉलर झाला. गेल्या दोन वर्षात कच्च्या तेलाचा हा सर्वाधिक दर आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: