Dilip Walse Patil: राजकीय हेतुने राज्यात असुरक्षिततेचे वातावरण तयार केले जातेय; गृहमंत्र्यांचा आरोप


हायलाइट्स:

  • सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून गृहमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले.
  • राजकीय हेतुने राज्यात असुरक्षिततेचे वातावरण तयार केले जातेय!
  • राज्यात दहा वर्षांच्या तुलनेत गुन्ह्यांच्या दरात फारशी वाढ नाही.

नागपूर: उपराजधानीतील गुन्ह्यांमध्ये मे, जून आणि ऑक्टोबर या महिन्यांत विशेष वाढ होते. नागपूर शहर पोलीस विभाग आणि विधी महाविद्यालयातर्फे केल्या जात असलेल्या संयुक्त संशोधनात्मक अभ्यासातून हे सत्य समोर आले आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून यावेळी वळसे पाटील यांनी विरोधकांना फटकारले. ( Dilip Walse Patil On Maharashtra Crime Rate )

वाचा:आर्यन खान प्रकरण गाजत असतानाच गृहमंत्र्यांचं ड्रग्जबाबत परखड मत; म्हणाले…

पोलीस जीमखाना येथे काही निवडक पत्रकारांशी वळसे पाटील यांनी संवाद साधला. ‘शहरातील गुन्हे वाढू लागलेत, हे खरे आहे. राज्यात तसेच शहरात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांची दखलही घेतली जाते आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत गुन्ह्यांच्या दरात फारशी वाढ झालेली नाही. केवळ काही जण राजकीय हेतुने राज्यात असुरक्षिततेचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात,’ असे यावेळी वळसे पाटील म्हणाले. महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबत ते म्हणाले की, अशा गुन्ह्यांमध्ये ९५ टक्के आरोपी हे नातेवाईक किंवा परिचित असतात, त्यामुळे अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी काही उपाययोजना आखण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

वाचा:‘समीर वानखेडे यांच्या विरोधात बोलाल तर…’; नवाब मलिक यांना धमकीचा फोन

वळसे पाटील यांनी या दौऱ्यात नागपूर व गडचिरोली परिक्षेत्रातील पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच शहरात राज्यातील पहिल्या वन्यजीव डीएनए तपासणी प्रयोगशाळेचा तसेच नागपूरसह पुणे, मुंबई येथील नव्या ३ फास्टट्रॅक प्रयोगशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आज केले. या कार्यक्रमालाही पाटील यांनी नागपुरातून ऑनलाइन हजेरी लावली.

सूरजागडने दिला २ हजारांना रोजगार

माओवादग्रस्त भागातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळाल्यास ते भरकटणार नाहीत. याच उद्देशाने सूरजागड येथील खाणकाम सुरू करण्यात आले आहे. यातून सुमारे २ हजार आदिवासींना रोजगार प्राप्त झाला आहे. सूरजागडला आजही माओवाद्यांचा धोका असल्याने तेथे आर्मड आऊट पोस्ट प्रस्तावित होती. त्याला केंद्राची मंजुरी मिळाली असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले.

वाचा: मुंबई: वन अविघ्न पार्क बिल्डरवर गुन्हा दाखल; आग दुर्घटनेवर पालिका कठोरSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: