टी-२० वर्ल्डकप: भारतीय संघाचे वेळापत्रक अपडेट झाले; अखेरच्या लढती कोणाविरुद्ध पाहा


दुबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपला १७ ऑक्टोबरपासून ओमान आणि युएईमध्ये सुरूवात झाली असून १७ ते २२ ऑक्टोबर या काळात पात्रता फेरीच्या लढती झाल्या. या लढतीत ८ संघात झाल्या आणि त्यापैकी ४ संघांनी सुपर १२ फेरीत प्रवेश केला. आज पात्रता फेरीच्या लढतींचा अखेरचा दिवस होता आणि ज्या ४ संघांनी मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे त्यांची नावे आणि स्थान निश्चित झाले आहे.

वाचा- भारत विरुद्ध इंग्लंड: रद्द झालेल्या पाचव्या कसोटीचा निर्णय झाला

पात्रता फेरीत ग्रुप ए मध्ये श्रीलंका, नामिबिया, आयर्लंड, नेदरर्लंड हे संघ होते. यापैकी श्रीलंका सहा आणि नामिबियाने चार गुण मिळवत ग्रुपमध्ये अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवले. श्रीलंकेने मुख्य स्पर्धेतील ग्रुप ए मध्ये तर नामिबियाने ग्रुप बी मध्ये स्थान मिळवले. पात्रता फेरीतील ग्रुप बी मध्ये स्कॉटलंडने सहा गुणांसह मुख्य स्पर्धेतील ग्रुप बी मध्ये तर बांगलादेशने ४ गुणांसह मुख्य स्पर्धेतील एक ग्रुपमध्ये स्थान मिळवले आहे.

वाचा- पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताकडे आहे हुकमी एक्का; हा फलंदाज कधीच बाद झाला नाही

पात्रता फेरीतील लढतींचा निकाल लागल्याने मुख्य स्पर्धेतील सर्व लढती स्पष्ट झाल्या आहेत. भारतीय संघाच्या लढती पुढील प्रमाणे आहेत.

वाचा- मॅच पाहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी पंतप्रधानांकडून घेतली २ दिवसांची सुट्टी, म्हणाले…

भारत विरुद्ध पाकिस्तान, २४ ऑक्टोबर, संध्याकाळी ७.३० वाजता, दुबई
भारत विरुद्ध न्यूझीलंड, ३१ ऑक्टोबर, संध्याकाळी ७.३० वाजता, दुबई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान, ०३ नोव्हेंबर, संध्याकाळी ७.३० वाजता, अबुधाबी
भारत विरुद्ध स्कॉटलंड, ०५ नोव्हेंबर, संध्याकाळी ७.३० वाजता, दुबई
भारत विरुद्ध नामिबिया, ०८ नोव्हेंबर, संध्याकाळी ७.३० वाजता, दुबईSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: