Rohit Pawar: महाविकास आघाडीविरुद्ध भाजपचं षडयंत्र, नेत्यांची बैठक झाली!; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट


हायलाइट्स:

  • महाविकास आघाडी सरकारविरुद्ध मोठं षडयंत्र.
  • आमदार रोहित पवार यांनी केला गौप्यस्फोट.
  • भाजप नेत्यांच्या बैठकीत षडयंत्र रचल्याचा दावा.

जळगाव: महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची कोंडी करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांनी एक बैठक घेऊन केंद्र सरकारच्या मदतीने ईडी व सीबीआय कारवाईचे षडयंत्र रचले. त्यानुसारच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवायांचे सत्र सुरू असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट आज जळगावातील एका कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी केला. ( Rohit Pawar On ED CBI Probe )

वाचा: खडसेंच्या ईडी चौकशीमागे कुणाचा हात?; रोहित पवारांनी केला गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान दुपारी त्यांनी जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार पवार म्हणाले की, विरोधकांकडून सीबीआयचा राजकारणासाठी सर्रास गैरवापर करण्याचा प्रकार फक्त आपल्या राज्यातच नाही तर राज्याबाहेरही सुरू आहे. राजकीय हेतुनेच हा प्रकार होत आहे. भाजपच्या या षडयंत्राची पार्श्वभूमी समजून घेऊन जनतेसमोर वस्तुस्थिती मांडायला हवी.

वाचा: ‘समीर वानखेडे यांच्या विरोधात बोलाल तर…’; नवाब मलिक यांना धमकीचा फोन

जीएसटीचे ३५ हजार कोटी केंद्राकडे

आमदार पवार यांनी पुढे सांगितले की, आजही राज्याचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. जीएसटी परताव्याचे ३५ हजार कोटी रुपये केंद्राकडे अडकले आहेत. हा पैसा मिळवण्यासाठी विरोधकांनी साधं एक पत्र तरी केंद्राला लिहिलंय का? ते या विषयासंदर्भात एक शब्दही काढायला तयार नाहीत. केंद्राच्या अखत्यारितील ओबीसी व मराठा आरक्षणासारखे प्रश्न प्रलंबित असताना विरोधक त्याबाबत बोलत नाहीत. विरोधक लोकांची फक्त दिशाभूल करून लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत. केंद्राकडे जीएसटीचे ३५ हजार कोटी रुपये अडकलेले असताना राज्य सरकारने कर्ज घेऊन कर्मचाऱ्यांचे पगार केले. शेतकरी, मजूर, व्यापारी तसेच इतर घटकांना मदतीचा हात दिला. करोना काळात आर्थिक ताण असतानाही राज्य सरकारने सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.

बेशिस्त कार्यकर्त्यांची कानउघाडणी

जळगाव राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयातील कार्यक्रम संपल्यानंतर रोहित पवारांचा महिला पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मोठी गर्दी झाली. याचवेळी काही कार्यकर्ते रोहित पवार यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी झुंबड करीत असल्याने गोंधळ होवून त्यात धक्काबुक्की झाली. या प्रकारामुळे आमदार रोहित पवार यांचा पारा चढला. त्यांनी या बेशिस्त कार्यकर्त्यांच्या दिशेने जात त्यांची तेथेच कानउघाडणी केली व शिस्त पाळण्यासाठी बजावले.

वाचा: समीर वानखेडे यांना पुन्हा नवाब मलिक यांचे आव्हान; ‘त्या’ दाव्यावर ठामSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: