पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताकडे आहे हुकमी एक्का; हा फलंदाज कधीच बाद झाला नाही


दुबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी भारतीय क्रिकेट संघ सज्ज आहे. वर्ल्डकपची सुरूवात उद्या म्हणजे २३ ऑक्टोबरपासून होणार असून भारत आणि पाकिस्तान यांची लढत २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पाकिस्तानच्या कर्णधाराने यावेळी भारताचा पराभव करू असे म्हटले आहे. पाकिस्तान संघाला आतापर्यंत कधीच वनडे आणि टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव करता आलेला नाही. भारतीय संघ या वर्षी देखील वर्ल्डकपमधील विजयाची परंपरा कायम ठेवण्यास उत्सुक असेल.

वाचा- विराट कोहली X बाबर आझम: दोन्ही कर्णधारांची ताकद, कच्चे दुवे आणि एक्स फॅक्टर

भारत पाकिस्तान सामन्यावर सर्वांची नजर असेल पण दोन्ही संघात असे काही खेळाडू आहे त्यांच्या कामगिरीवर विजयाचे पारडे झुकू शकते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची पाकिस्तानविरुद्धची कामगिरी अफलातून आहे. २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या लढतीत विराटच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे. याचे कारण देखील तितकेच खास आहे.

कर्णधार म्हणून विराट कोहली कोणती रणनीती वापरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याच बरोबर फलंदाज म्हणून विराट कशी कामगिरी करतो यावर सर्वांची नजर असेल. कारण पाकिस्तानविरुद्ध टी-२० वर्ल्डकपमध्ये विराटच्या फलंदाजीला आणखी धार चढते. पाकिस्तानच्या गोलंदाजांना विराटला टी-२० वर्ल्डकपमध्ये एकदाही बाद करता आलेले नाही.

वाचा- टी-२० वर्ल्डकपसाठी कशी आहे खेळपट्टी; टीम इंडिया या मैदानावर खेळणार सर्वाधिक

विराटने पाकिस्तानविरुद्ध टी-२० वर्ल्डकपमध्ये तीन डाव खेळले आहेत. २०१२ साली त्याने पाक विरुद्ध ६१ चेंडूत नाबाद ७८ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१४ साली ३२ चेंडूत नाबाद ३६ तर २०१६ सारी ३७ चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या आहेत. याचा अर्थ विराटने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत टी-२० वर्ल्डकपमध्ये १३० चेंडूत नाबाद १६९ धावा केल्या आहेत. पाकिस्तानच्या एकाही गोलंदाजाला विराटची विकेट घेता आलेली नाही. या शिवाय भारताकडून टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध त्यानेच सर्वाधिक धावा केल्या आहेत.

वाचा- पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी सर्व टेन्शन गेले; भारताची प्लेइंग इलेव्हन तयार

टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

विराट कोहली- १६९
गौतम गंभीर- ७५
रोहित शर्मा- ६४
युवराज सिंग- ५९
रॉबिन उथप्पा- ५८Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: