चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्याने चुकून गोळी झाडली; सिनेमॅटोग्राफर ठार, दिग्दर्शक जखमी


न्यू मेक्सिको: चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्याने चुकून झाडलेल्या गोळीमध्ये एका सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू झाला आहे. तर, चित्रपटाचा दिग्दर्शक जखमी झाला आहे. ज्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली, त्या बंदुकीचा वापर चित्रपटात करण्यात येणार होता. न्यू मेक्सिकोमधील सांता फे मधील बोनान्जा क्रीक रेंच चित्रपटाच्या सेटवर ही घटना घडली.

अभिनेता एलेक बाल्डविन हे आगामी चित्रपट ‘रस्ट’चे चित्रीकरण करत होते. त्यादरम्यान त्यांच्याकडून चुकून गोळी झाडली गेली. यामध्ये ४२ वर्षीय सिनेमॅटोग्राफर हलिना हचिन्स हिचा मृत्यू झाला. तर, लेखक-दिग्दर्शक ४८ वर्षीय जोएल सुझा देखील जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

चीनमध्ये पुन्हा करोनाचा उद्रेक; शाळा बंद, विमान सेवा स्थगित
गोळीबारात जखमी झालेल्या हलिना हचिन्सला तातडीने उपचारसाठी हेलिकॉप्टरने न्यू मेक्सिको विद्यापीठाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर, सुझा यांना जवळच्या रुग्णालयात रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती उपलब्ध झाली नसल्याचे ‘डेली मेल’ने म्हटले.

अमेरिका: धावत्या मेट्रो रेल्वेत बलात्कार; प्रवाशांकडून मदतीऐवजी व्हिडिओ रेकोर्डिंग!
या घटनेबाबत बाल्डविन, सुझा आणि ‘रस्ट’च्या कार्यकारी निर्मात्यांनी मौन बाळगले आहे. पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही. या घटनेत हलिना हचिन्सच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक कलाकारांनी तिला आदरांजली व्यक्ती केली आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: