अमानुष! कोंबडीच्या पिल्लाची शिकार केल्याचा रागातून शेजाऱ्यांने मांजरीवर झाडली गोळी


हायलाइट्स:

  • जळगावात घडला अमानुष प्रकार
  • कोंबडीचे पिल्लू खाल्याने मांजरीवर हल्ला
  • हल्लेखोरावर गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू

म. टा. प्रतिनिधी, जळगावः कोंबडीचे पिल्लू खाल्ले म्हणून राग अनावर झालेल्या एका माथेफिरुन एअरगनच्या साह्याने मांजरीवर गोळी घालून तीला गंभीर जखमी केले. हा धक्कादायक प्रकार जळगाव शहरातील वाघ नगर परिसरात घडला आहे. जखमी होवून विव्हळणाऱ्या मांजरीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्राणी प्रेमी नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

जळगाव शहारातील वाघ नगर परिसरात पुष्पराज बाणाईत यांचे निवासस्थान आहे. प्राणी प्रेमी असल्याने बाणाईत व त्याच्या कुटुंबियांकडून अनेक भटक्या मांजरीचे संगोपन केले जाते. त्यांच्याकडे नेहमी अश्या मांजरी असतात. त्यांच्याच घराजवळ राहणाऱ्या हेमराज सोनवणे या तरुणाने कोंबड्या पाळल्या आहेत. आज गुरुवारी सकाळी बाणाईत यांच्या घरात येणाऱ्या एका भटक्या मांजरीने हेमराज सोनवणे यांच्या घरातील एक कोंबडीच्या पिल्लावर हल्ला केला.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का

कोंबडीचे पिल्लू मांजरीने पकडून ते नेत असल्याचे लक्षात येताच हेमराज सोनवणे याचा संताप अनावर झाला. त्याने घरातून छऱ्यांची एअरगन आणून मांजरीवर गोळी झाडली. यात मांजरीच्या डोक्यावर गंभीर दुखापत होवून त्याच ठिकाणी मांजर विव्हळत पळली. याबाबत बाणाईत यांनी हेमराज यास जाब विचारला असता ‘मी असाच आहे, मी असाच आहे’ असे बेजाबदारपणाचे उत्तर त्याने दिले. ‘त्या काळ्या मांजरीचा देखील मी जीव घेईल’ अशी धमकी त्याने दिली. याबाबत बाणाईत यांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेत हेमराज सोनवणे याच्याविरुध्द तक्रार दिली आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

जळगावमध्ये काँग्रेसनंतर आता भाजपही स्वबळावर; सर्वपक्षीय पॅनलचा फज्जा

दरम्यान, मांजरीचा विव्हळतांनाचा तसेच बेजाबदारपणे आपल्या कृत्याचे समर्थन करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्याने निर्दयीपणे मांजरीचा जीव घेणाऱ्या हेमराज सोनवणे यांच्याविरुध्द जनमाणसातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: