Mumbai Crime: मुंबईत मोठी कारवाई; १० लाखांची खंडणी घेताना RTI कार्यकर्ता अटकेत


हायलाइट्स:

  • दहा लाख खंडणी घेताना आरटीआय कार्यकर्ता अटकेत.
  • विरोधातील अर्ज मागे घेण्यासाठी मागितली होती खंडणी.
  • गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून केली कारवाई.

मुंबई: बांधकाम कंत्राटदाराकडून दहा लाखांची खंडणी उकळणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. रमेश शहा असे या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव असून ही रक्कम घेताना शहा याला पकडण्यात आले. ( RTI Activist Arrested In Mumbai )

वाचा: भीक मागण्यासाठी चिमुकल्याचे अपहरण; महिला रिक्षाचालकाला अटक

सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे कंत्राटदाराला अंधेरी येथील कार्यालयाच्या कार्यालयाची भिंती, वनराई पोलीस वसाहत आणि तीन डोंगरी पोलीस वसाहतीचे नूतनीकरण हे काम देण्यात आले होते. हे काम सुरू करताच आरटीआय कार्यकर्ते रमेश शहा हे त्या ठिकाणी गेले. बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत शहा याने काम थांबविण्यास सांगितले. हे कंत्राट कसे देण्यात आले, बांधकामात कोणते साहित्य वापरण्यात आले? याची माहिती मिळविण्यासाठी शहा याने शासकीय कार्यालयात माहितीचा अर्ज केला. हा अर्ज मागे घेण्यासाठी शहा याने कंत्राटदाराकडे दहा लाखांची मागणी केली.

वाचा: पालिका अधिकाऱ्याकडे कोट्यवधीचे घबाड; ३ फ्लॅट, ११ लाख कॅश, अर्धा किलो सोनं!

दहा लाख रूपये द्यायचे नसल्याने या कंत्राटदाराने पोलिसांत तक्रार केली. त्यावरून डी. एन. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचला व दहा लाखाची रक्कम स्वीकारताना शहा याला रंगेहाथ अटक केली. गुन्हे शाखा युनिट ९ च्या पथकाने ही कारवाई केली.

वाचा: समीर वानखेडे यांना पुन्हा नवाब मलिक यांचे आव्हान; ‘त्या’ दाव्यावर ठामSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: