करोना: भारतात मृत्यूदर, रुग्णसंख्या घटली; जागतिक आरोग्य संघटनेची माहिती


संयुक्त राष्ट्रे/जीनिव्हा: देशात ११ ते १७ ऑक्टोबर या आठवड्यात दैनंदिन करोनारुग्णांच्या संख्येत १८ टक्के, तर करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत १३ टक्के घट झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ही आकडेवारी जाहीर केली आहे.

जागतिक स्तरावर युरोप वगळता सर्व प्रदेशांमध्ये नवीन करोनारुग्णांच्या साप्ताहिक संख्येत घट झाली असल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने अधोरेखित केले आहे. युरोपमध्ये आधीच्या आठवड्याच्या तुलनेत नवीन रुग्णसंख्येत सात टक्के वाढ झाली आहे. ११ ते १७ ऑक्टोबरदरम्यान जगभरात २७ लाख नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ४६ हजारांहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. या कालावधीत भारतात एक लाख १४ हजार २४४ नवीन रुग्णांची नोंद झाली. ही संख्या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत १८ टक्के कमी आहे. ११ ते १७ ऑक्टोबर या आठवड्यात करोनामुळे भारतात १,५३५ रुग्णांचा मृत्यू झाला. ही संख्या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत १३ टक्के कमी आहे.

करोना महासाथीकडे दुर्लक्ष; राष्ट्रपतींविरोधात खटला चालवण्याची शिफारस

‘या’ देशात करोनाची पाचवी लाट?; रुग्णालयात बाधितांची संख्या वाढली
‘डब्ल्यूएचओ’ने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, साप्ताहिक रुग्णसंख्येतील सर्वाधिक घट (१८ टक्के) आफ्रिकी प्रदेशात नोंदवण्यात आली. त्यापाठोपाठ पश्चिमी प्रशांत प्रदेशात १६ टक्के घट झाली आहे. साप्ताहिक मृत्युदरातील सर्वाधिक घटदेखील (२५ टक्के) आफ्रिकी प्रदेशात नोंदवण्यात आली. त्यापाठोपाठ दक्षिण-पूर्व आशिया प्रदेश (१९ टक्के) आणि पूर्व भूमध्यसागरीय प्रदेश (८ टक्के) यांचा क्रमांक लागला आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: