अटल पेन्शन योजनेमधून कसे काढायचे पैसे; जाणून घ्या सर्वकाही


मुंबई :अटल पेन्शन योजना (APY) ही भारतातील नागरिकांसाठीची विशेष पेन्शन योजना आहे, जी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राबविण्यात आली आहे. एपीवाय अंतर्गत, वर्गणीदारांच्या योगदानावर आधारित ६० वर्षांच्या वयात त्यांना किमान १०००, २०००, ३०००, ४००० किंवा ५००० रुपये दरमहा पेन्शनची हमी मिळते. जर तुम्ही या योजनेअंतर्गत खाते उघडले असेल आणि तुम्हाला पैसे काढायचे असतील, तर प्रक्रिया काय आहे, ती जाणून घ्या.

वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर –

६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ग्राहक संबंधित बँकेला किमान मासिक पेन्शन किंवा कमाल मासिक पेन्शन मिळविण्यासाठी संबंधित बँकेला विनंती करेल. ग्राहकाच्या मृत्यूनंतर जोडीदाराला (डिफॉल्ट नॉमिनी – पत्नी/पती) समान मासिक पेन्शन दिले जाते. नामनिर्देशित ग्राहक पती किंवा पत्नी दोघांच्या मृत्यूनंतर वयाच्या ६० वर्षांपर्यंत जमा झालेल्या पेन्शनच्या रकमेच्या परताव्यासाठी पात्र असेल.

वयाच्या ६० वर्षांनंतर कोणत्याही कारणामुळे ग्राहकाचा मृत्यू झाल्यास –
ग्राहकाचा मृत्यू झाल्यास पती किंवा पत्नीला ही पेन्शन मिळेल आणि त्या दोघांच्या (ग्राहक आणि जोडीदार) मृत्यूनंतर ग्राहकाचे वय ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत जमा केलेली पेन्शन रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला परत केली जाईल.

वयाच्या ६० वर्षांपूर्वी योजनेतून बाहेर पडल्यास :
वयाच्या ६० वर्षांपूर्वी योजनेच्या बाहेर पडण्यास परवानगी नाही. केवळ पीएफआरडीए (PFRDA) द्वारे अपवादात्मक परिस्थितीत परवानगी दिली जाऊ शकते. म्हणजेच, लाभार्थीचा मृत्यू किंवा असाध्य रोग इत्यादींमध्ये पूर्व-परिपक्व निर्गमनची तरतूद (प्री मॅच्युअर एक्झिट).

६० वर्ष वयापूर्वी ग्राहकाचा मृत्यू झाल्यास :
एपीवाय अंतर्गत संपूर्ण ठेव रक्कम पती-पत्नी (जोडीदार)/नामनिर्देशित व्यक्तीला परत केली जाईल, पण जोडीदार/नामनिर्देशित व्यक्तीला पेन्शन देय होणार नाही.

अटल पेन्शन योजनेतील ग्राहकांना योजनेतून बाहेर पडण्याची सुविधा आहे. जर एखाद्या ग्राहकाला योजना पूर्ण झाल्यावर बाहेर पडायचे असेल, तर त्याने हे सुनिश्चित केले पाहिजे की, त्याचे बचत बँक खाते अजूनही सक्रिय आहे. यामुळे पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल आणि वेळेत बँक खात्यात पैसे जमा होतील.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: