बापरे! अवघ्या २२ वर्षीय तरुणाकडून साडेसात लाखांची ब्राऊन शुगर जप्त, पोलिसही हादरले


अकोला : अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूरपीडित कॉर्टर येथील एका घरात ब्राऊन शुगरचा साठा असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ५०० ग्राम तब्बल साडेसात लाख रुपयांचा ब्राऊनशुगरचा साठा जप्त केला असून यात एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध अकोट फाइल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातल्या पूर पीडित कॉर्टर येथील रहिवासी २२ वर्षीय अफजल खान जलील खान हा त्याच्या राहत्या घरातून महागड असलेले अमली पदार्थ ब्राउन शुगरची मोठ्या प्रमाणात तस्करी करत होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष महल्ले यांना मिळाली. या माहितीवरून सहायक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण व त्यांच्या पथकाने अकोट फाइलमध्ये आरोपीच्या घरी पाळत ठेवून छापा टाकला.

यानंतर घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचे ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले आणि या आरोपीविरुद्ध अकोट फाइल पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जालन्यात आंदोलनSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: