किरीट सोमय्यांच्या आरोपांना अजित पवारांचं ‘दादा स्टाइल’ उत्तर


हायलाइट्स:

  • किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवार बोलले!
  • आरोप सिद्ध करायला पुरावे लागतात – अजित पवार
  • एक-दोन नव्हे ५०-६० कारखान्यांचा प्रश्न आहे – अजित पवार

मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं महाविकास आघाडी सरकारमधील मंंत्री व नेत्यांवर आरोप करत आहेत. त्यांच्या विरोधात विविध यंत्रणांकडं तक्रारी करत आहेत. नुकतेच सोमय्या यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊन जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातील कागदपत्रे ईडीला दिली व उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आरोप केले. सोमय्या यांच्या या आरोपांना अजित पवार यांनी आज प्रथमच उत्तर दिलं. (Ajit Pawar on Kirit Somaiya‘s Allegations)

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘कुणी भ्रष्टाचार केला असेल तर तो पुढं येईल किंवा केला नसेल तर तेही पुढं येईल. आरोप करणं हे विरोधी पक्षाचं कामच आहे. त्याच पद्धतीनं ते आरोप करत आहेत. पण काही जण एवढी कागदपत्रं दाखवतात की जणू हेच चौकशी करणार आहेत. कुठल्याही गोष्टीची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत, त्यांना चौकशीचे अधिकार आहेत. त्या चौकशी करतीलच, दुसरं कुणी करणार आहे का,’ असा टोला अजित पवार यांनी सोमय्यांना हाणला.

वाचा: फडणवीसांबद्दल मी असं कधीच बोललो नव्हतो; गडकरींचा तात्काळ खुलासा

‘कोणी काही आरोप करत असले तरी त्याच्याकडं पुरावा मागितला जाईल. नुसत्या बिनबुडाच्या आरोपाला अर्थ नसतो. यातल्या अनेक प्रकरणांमध्ये पूर्वीच्या सरकारच्या काळातही चौकशी झालेली आहे. सीआयडी, एसीबी, एडब्लूओ यांनीही चौकशी केली आहे. सहकार विभागानं एका न्यायाधीशांच्या देखरेखीखाली सुद्धा चौकशी केलीय,’ असं अजित पवार म्हणाले. ‘मुळात एक किंवा दोन कारखाने चालवायला दिले किंवा विकले गेले असं झालेलं नाही. हा आकडा ६० ते ७० पर्यंत असू शकतो आणि त्यात सर्वच राजकीय पक्षाशी संबंधित उद्योगपती, बिल्डर आहेत,’ असा सूचक इशाराही त्यांनी भाजपला दिला.

वाचा: शाहरुख खानच्या घरी एनसीबीचा छापा?; समीर वानखेडे म्हणाले…Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: