एलन मस्क होणार जगातील पहिले ट्रिलिनियर; रॉकेटच्या वेगाने वाढतेय संपत्ती


न्यूयॉर्क : जगभरात मायक्रोचिपची कमतरता असूनही इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे उत्पन्न आणि नफा तिसऱ्या तिमाहीत नव्या विक्रमांवर पोहोचला आहे. कंपनीचा शेअरही सातत्याने वाढत आहे. यावर्षी कंपनीचा शेअर १८ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांची नेटवर्थ रॉकेटच्या वेगाने वाढत आहे. या वर्षी त्यांच्या संपत्तीत ७२ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

ज्याप्रकारे मस्क यांची संपत्ती वाढत आहे, ते पाहता ते जगातील पहिले ट्रिलिनियर व्यक्ती बनू शकतात. म्हणजेच त्यांची नेटवर्थ येत्या काही दिवसात १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते. मॉर्गन स्टॅनलीचे विश्लेषक अॅडम जोन्स म्हणतात की, मस्कची कंपनी स्पेसएक्समध्ये प्रचंड वाढीची क्षमता आहे. हेच कारण आहे की, मस्क जगातील पहिले ट्रिलिनियर बनण्याची शक्यता वाढली आहे. टेस्लाच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांनुसार, कंपनीचे निव्वळ उत्पन्न १.६२ अब्ज डॉलर होते. कंपनीचे उत्पन्न १ अब्ज डॉलर्स ओलांडण्याची ही दुसरी वेळ आहे. मागील तिमाहीत कंपनीचे निव्वळ उत्पन्न ३३१ दशलक्ष डॉलर होते.

टेस्लाचा विक्रमी नफा
टेस्लाची तीन तिमाहींची कमाई ५७ टक्क्यांनी वाढून १३.८ अब्ज डॉलर झाली, तर नफा ७७ टक्क्यांनी वाढून ३.७ अब्ज डॉलर्स झाला आहे. कंपनीने या महिन्यात जाहीर केले की, त्यांनी पहिल्या तिमाहीत २,३७,८२३ वाहने तयार केली आणि २,४१,३०० वाहनांची डिलिव्हरी केली. ऑटोमोटिव्ह विभागाच्या एकूण मार्जिनमध्ये सुधारणा झाल्याने कंपनीचा नफा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, चिपची कमतरता आणि बंदरांवर गर्दीमुळे टेस्लाचे कारखाने पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीत, पण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या प्रॉडक्शन टीमने या अडचणींवर मात करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मस्कची एकूण संपत्ती २४२ अब्ज डॉलर झाली आहे आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस खूप मागे आहेत. मस्कची एकूण संपत्ती बिल गेट्स आणि वॉरेन बफे यांच्या एकत्रित निव्वळ संपत्तीपेक्षा जास्त आहे. १३३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गेट्स श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत, तर बफेट १०५ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह १० व्या क्रमांकावर आहेत.

दरम्यान, ब्लूमबर्गच्या बिलियनेअर इंडेक्सनुसार, स्पेसएक्स मस्कच्या यांच्या निव्वळ संपत्तीमधील १७ टक्के वाटा एकट्या स्पेसएक्सचा आहे. येत्या काही दिवसांत त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. स्पेसएक्स अंतराळ प्रवासाच्या क्षेत्रात खूप वेगाने काम करत आहे. त्याच्या अंतर्गत अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या रॉकेट आणि उपग्रह तयार करण्यात, सखोल अंतराळ संशोधनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यांची उपग्रह संप्रेषण कंपनी (सॅटेलाईट कम्युनिकेशन) स्टारलिंकमध्येही मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: