kulgam terror attack : काश्मीरमध्ये बिहारच्या मजुरांवर दहशतवाद्यांचा हल्ला; दोन ठार, तर एक जखमी


श्रीनगरः काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी तीन मजुरांवर गोळ्या झाडल्या. यात दोन ठार झाले असून एक जण जखमी आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात राजा रेशी देव, जोगिंदर रेशी देव या दोन मजूरांचा जागीच मृत्यू, तर चुंचुन रेशी देव (जखमी) जखमी झाले आहेत. हे सर्व मजूर बिहारचे रहिवासी आहेत. दहशतवाद्यांनी या मजुरांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला, अशी माहिती आहे.

कुलगामच्या वानपोह भागात दहशतवाद्यांनी मजुरांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात २ जण ठार आणि एक जखमी झाला आहे. जखमी मजुराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी पोलीस आणि बीएसएफने परिसराला घेरलं आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली.

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या दहशतवादविरोधी कारवाईमुळे दहशतवादी अस्वस्थ झाले आहेत. ते एकापाठोपाठ एक बिगर काश्मिरींना आपल्या हल्ल्याचे लक्ष्य करत आहेत. दहशतवाद्यांनी पुलवामा आणि श्रीनगरमध्ये एका दिवसापूर्वी दोन जणांची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेनंतर पुन्हा एकदा लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे. सुरक्षा दलाचे जवान आणि स्थानिक पोलिसांकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

नितीशकुमारांकडून मदत घोषित

काश्मीर बाहेरील नागरिकांवर दहशतवादी हल्ले वाढत आहेत. दहशतवाद्यांनी आज कुलगाममध्ये बिहारच्या मजुरांवर हल्ला केला. या प्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना फोनकरून त्यांच्याशी चर्चा केली. तसंच या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. नितीशकुमार यांनी दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या दोन मजुरांच्या कुटुंबीयांना २ – २ लाखांची मदत जाहीर केली आहे.
pulwama encounter : पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, PSI अर्शीद यांच्या मारेकऱ्यांना कंठस्नान

जम्मू -काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सने दुःख व्यक्त केले

जम्मू -काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सने या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. यात दोन मजुरांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आमची सहानुभूती त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे, असं नॅशनल कॉन्फरन्सने म्हटलं आहे.

Poonch Encounter: पूँछमध्ये गेल्या पाच दिवसांत सात जवान शहीद, दहशतवाद्यांविरोSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: