aryan khan drug case : आर्यन खानचं नाव न घेता ओवैसी म्हणाले, ‘मी गरीब मुस्लिमांबद्दल बोलेन…’


गाझियाबादः बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणी तुरुंगात आहे. काही जण आर्यन संदर्भात शाहरुखचे समर्थन करताना दिसत आहेत, तर अनेकांकडून टीकाही होत आहे. आता या मुद्द्यावर एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनीही आर्यन खान प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

‘एका अभिनेत्याच्या मुलासाठी बोला, असा आग्रह आपल्याला करण्यात येत आहे. पण जे गरीब आहेत, त्यांच्याबद्दल मी बोलेन. उत्तर प्रदेशातील तुरुंगांमध्ये २७ टक्के मुस्लीम आहेत, त्यांच्याबद्दल कोण बोलेल?’, असं ओवैसी म्हणाले. ‘जे गरीब आहे त्यांच्याबद्दल बोलेल, ज्याचे वडील श्रीमंत आहेत, त्याच्याबद्दल बोलणार नाही’, असं ओवैसी म्हणाले.

ओवैसी यांनी गाझियाबादमध्ये एक सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. लखीमपूर हिंसाचारावरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. आशिष मिश्रा हा एक शक्तिशाली उच्च जातीचा आहे. यामुळे केंद्रीय गृह राज्यमंत्री असलेल्या त्याच्या वडिलांची पंतप्रधान मोदी हे मंत्रिमंडळातून हकालपट्टी करू शकत नाहीत. आशिषचे नाव आतीक असते, तर त्याला आतापर्यंत घरात मारले गेले असते किंवा त्याच्या घरावर बुलडोझर चालवले गेले असते. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आशिषच्या अब्बांना का वाचवत आहेत?, असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी केला.

बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणी तुरुंगात आहे. न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज राखून ठेवला आहे. यामुळे त्याला २० तारखेपर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे. दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गरिबांना मदत करेन, असं वचन आर्यन खानने नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांना आश्वासन दिल्याचं सांगण्यात येतंय.

‘सिंघू सीमेवर हात पाय कापून दलिताची क्रूर हत्या, काँग्रेस मूग गिळून गप्प का?’

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आर्यन खानचे समुपदेशन केले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गरीब आणि दुर्बल नागरिकांना मदत करेल. तसंच एक दिवस असं काम करेन ज्यामुळे सर्वांना अभिमान वाटेल, असंही आर्यन खानने समुपदेशनादरम्यान वचन दिल्याचं बोललं जातंय.

rajasthan congress : आता राजस्थानचा नंबर! CM गहलोतांसोबत राहुल, प्रियांकांची ‘विशेष बैठक’Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: