Girish Mahajan: पक्षाने उमेदवारी दिली नाही तर गिरीश महाजन चित्रपटात काम करणार!; बघा काय म्हणाले?


हायलाइट्स:

  • उमेदवारी मिळाली नाही तर चित्रपटात संधी द्या
  • गिरीश महाजन यांनी निर्मात्याकडे केली मागणी.
  • महाजन यांच्या विधानानंतर चर्चेला आले उधाण.

जळगाव: ‘आपली आमदारकीची सहावी टर्म असून, आता यापुढे जर पक्षाने उमेदवारी दिली नाही तर आम्हाला एखाद्या चित्रपटात भूमिका करण्याची संधी द्या’, अशी मिश्कील मागणी भाजपा नेते आमदार गिरीश महाजन यंनी एका चित्रपट निर्मात्याकडे केली आहे. जामनेर येथे गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ‘हलगट’ या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रमोशन करण्यात आले. यावेळी महाजन यांनी केलेल्या विधानाने सगळेच चकीत झाले. या विधानावर बरीच चर्चाही रंगली आहे. ( Girish Mahajan Latest News )

वाचा: अर्धे कशाला, पूर्ण मंत्रिमंडळ टाका ना तुरुंगात!; मंत्र्याचे फडणवीसांना आव्हान

गिरीश महाजन म्हणाले की, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील व माझी आता आमदारकीची सहावी टर्म आहे. सलग तीस वर्षे आमदारकी भूषवल्याने पक्ष एकाच व्यक्तीला किती वेळा संधी देणार? त्यामुळे यापुढे जर पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला निवृत्तीच घ्यावी लागेल. मग अशावेळी काय करायचे? हा प्रश्न उरेल. त्यामुळे भविष्यात आम्हालाही आपल्या चित्रपटात एखादी भूमिका करण्याची संधी द्या, अशी मागणीच गिरीश महाजन यांनी हलगट चित्रपटाच्या निर्मात्याकडे केली.

वाचा: महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न!; पवारांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

…तर तुमच्यासाठी इंगजी चित्रपट काढू

गिरीश महाजन यांनी चित्रपटात भूमिका देण्याची मागणी केल्यानंतर चित्रपट निर्माते बाबुराव घोंगडे यांनीही महाजन यांच्या या मिश्कील मागणीचा धागा पकडत, तुमच्यासाठी इंग्रजी चित्रपट काढून त्यात काम करण्याची संधी देईन, असे सांगताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

वाचा: करोना: राज्याची चिंता वाढवणाऱ्या ‘या’ जिल्ह्यातून मोठा दिलासाSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: