विश्वचषक विजेत्याला मिळणार नाही आयपीएलच्या उपविजेत्याएवढे बक्षिस, जाणून घ्या किती कोटींचा फरक आहे…


नवी दिल्ली : भारत हा क्रिकेटमधली महासत्ता आहे, असे म्हटले जाते आणि याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. कारण एक धक्कादायक गोष्ट आता समोर आली आहे. ती गोष्ट म्हणजे आयपीएलच्या उपविजेत्याला जेवढे रोख बक्षिस मिळते त्यापेक्षाही कमी रक्कम ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेत्या संघाला मिळणार आहे. त्यामुळे विश्वचषक विजेता आणि आयपीएल विजेत्या संघांच्या रोख बक्षिसांमध्ये कोट्यावधींची तफावत असल्याचे आता समोर आले आहे. जो संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकणार आहे, त्यांना १.६ मिलियन डॉलर एवढी रक्कम बक्षिस स्वरुपात मिळणार आहे. भारतीय रुपयांनुसार ही रक्कम १२ कोटी २० लाख एवढी होते. विश्वचषकातील उपविजेत्या देशाला ८ लाख मिलियन एवढी बक्षिसाची रक्कम मिळणार आहे, जी भारतीय रुपयांमध्ये ६.१० कोटी रुपये एवढी होते. त्याचबरोबर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही देशांना प्रत्येकी ४ लाख डॉलर एवढे रोख बक्षिस मिळणार आहे, भारतीय रुपयांनुसार त्याची किंमत प्रत्येकी साडे तीन कोटी रुपये एवढी होते.

आयपीएलमध्ये यापेक्षा कितीतरी जास्त रक्कम संघांना दिली जात असल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण आयपीएलच्या विजेत्याला बीसीसीआयला २० कोटी रुपये देत असल्याचे समोर आले आहेत. विश्वचषकातील विजेत्या आणि उपविजेत्यांच्या रक्कमेपेक्षाही आयपीएलचे जेतेपद पटकावलेल्या संघाची बक्षिसाची किंमत ही जास्त आहे. कारण विश्वचषकातील विजेत्य आणि उपविजेत्या संघांची बक्षिसांची रक्कम ही १८ कोटी ३० लाख एवढी होते, पण आयपीएलच्या एकट्या विजेत्यालाच त्यापेक्षा जास्त म्हणजे २० कोटी एवढी रक्कम मिळते. विश्वचषकाच्या विजेत्या देशाला जेवढी रक्कम मिळते, त्याच्यापेक्षा आयपीएलच्या उपविजेत्या जास्त बक्षिस मिळत असल्याचेही समोर आले आहे. कारण आयपीएलच्या उपविजेत्या संघाला १२ कोटी ५० लाख एवढी रक्कम बक्षिस स्वरुपात मिळते, त्यामुळे विश्वचषकातील विजेत्याच्या रक्कमेपेक्षा ती ३० लाख रुपयांनी जास्त आहे. त्यामुळेच खेळाडू आयपीएल खेळायला जास्त का प्राधान्य देतात, याचे कारणही आता यामुळे समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: