Coronavirus In Maharashtra: राज्याला दिलासा; करोना रुग्णसंख्येत मोठी घट, निर्बंध शिथील केल्यानंतरही…


हायलाइट्स:

  • राज्यात आज २६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • दिवसभरात १ हजार ५५३ नवीन रुग्णांचे निदान
  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहचले ९७.३८ टक्क्यांवर.

मुंबई: राज्यात करोनाचा ग्राफ वेगाने खाली येत आहे. सध्या दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजाराच्या खाली आली असून मृत्यूंची संख्याही कमी झाली आहे. राज्यात सध्या करोनाचे २९ हजार ६२७ सक्रिय रुग्ण असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७.३८ टक्के इतके झाले आहे. मुख्य म्हणजे निर्बंध बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात आल्यानंतरही रुग्णसंख्या कमी होत असल्याने हा राज्यासाठी खूप मोठा दिलासा ठरला आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest Updates )

वाचा: करोना: राज्याची चिंता वाढवणाऱ्या ‘या’ जिल्ह्यातून मोठा दिलासा

राज्यात कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर होत चालल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना संसर्गाच्या प्रादुर्भावावर खूप मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे दिसत आहे. लसीकरण वेगवानपणे होत असल्याने त्याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. त्यामुळेच दैनंदिन रुग्णसंख्या घटत चालली असून आज दीड हजाराच्या टप्प्यावर ही संख्या आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील स्थिती काहीशी चिंता वाढवणारी होती. तिथेही शनिवारी तीनशेपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेतील निचांक (२५८ नवे रुग्ण) आज तिथे नोंदवला गेला आहे. राज्याचा विचार केल्या आज २६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली तर दिवसभरात १ हजार ५५३ नवीन रुग्णांची भर पडली. त्याचवेळी १ हजार ६८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

वाचा: अर्धे कशाला, पूर्ण मंत्रिमंडळ टाका ना तुरुंगात!; मंत्र्याचे फडणवीसांना आव्हान

राज्यातील करोनाची आजची स्थिती

– राज्यात आज २६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ % एवढा आहे.
– आज १,६८२ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,१६,९९८ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.३८ % एवढे झाले आहे.
– आज राज्यात १,५५३ नवीन रुग्णांचे निदान.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,०९,०९,९९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,८९,९८२(१०.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात २,३४,८०७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर १,०२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
– राज्यात सध्या करोनाचे २९ हजार ६२७ सक्रिय रुग्ण.

मुंबईतील गेल्या २४ तासांतील स्थिती

बाधित रुग्ण- ३३३
बरे झालेले रुग्ण- ५२६
बरे झालेले एकूण रुग्ण- ७२६५६६
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ९७%
एकूण सक्रिय रुग्ण- ५१८३
दुप्पटीचा दर- ११४१ दिवस
कोविड वाढीचा दर (९ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर)-०.०६%

वाचा: महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न!; पवारांचा मोदी सरकारवर गंभीर आरोपSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: