गाडी चालवत होती महिला, बोनेटवर अचानक आला ‘अजगर’ आणि…


कार चालवताना अचानक तुमच्या गाडीच्या बोनेटवर साप आला तर तुमची काय अवस्था होईल? याचा कधी विचार केलाय का ? अशी घटना घडली असून सर्पमित्रांनी एका महिलेच्या कारच्या बोनेटवर आलेल्या अजगराला अलगद कारबाहेर काढले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या एका महिलेला गाडी चालवत असताना अचानक तिच्या बोनेटखाली अजगर दिसला. पाच फुटांचा हा अजगर बघून ती भयंकर घाबरली. हळूच गाडीबाहेर येऊन तिने सर्मतज्ञ ल्यूक हंटले यांना फोन केला. हंटले यांनी घटनास्थळी पोहोचून त्यांनी सावधगिरी बाळगून कारच्या बोनेटवरून अजगाराला बाहेर काढले.

सर्पतज्ञ ल्यूक हंटले यांनी अजगराला गाडीतून बाहेर काढत असताना व्हिडीओ बनवला आणि तो फेसबुकवर शेअर केला. ते सांगतात की, अजगराच्या डोक्याला पकडून बाहेर काढावे लागले. मला अशा पद्धतीने अजगर पकडायला आवडत नाही, पण त्याच्या सुरक्षिततेकरिता मला त्याला अशा पद्धतीने पकडावं लागलं. जेव्हा मी त्याची शेपटी इंजिनमधून वर येताना पाहिली तेव्हा तो सुरक्षित असल्याची खात्री पटली.

हा अजगर 20 वर्षे जिवंत राहून आपले भक्ष्य मिळवू शकतो. ऑस्ट्रेलियात या अजगराच्या प्रजाती जंगल, किनारी भूप्रेदश, ग्रामीण वस्ती, पार्क आणि उद्याने अशा ठिकठिकाणी आढळतात, अशी माहिती या अजगराविषयी सर्पतज्ज्ञ ल्यूक हंटले यांनी दिली.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: