पहिला डोस एस्ट्राजेनकाचा, दुसरा डोस मॉडर्नाचा; मर्केल यांच्या लसीकरणाची चर्चा


बर्लिन: करोना लशीची परिणामकता वाढवण्यासाठी दोन भिन्न कंपन्यांच्या लशीचे डोस देण्याबाबतची चाचपणी सुरू आहे. तर, दुसरीकडे जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांनी करोना लशीचे दोन भिन्न डोस घेतले. मर्केला यांनी पहिला डोस एस्ट्राजेनकाचा, दुसरा डोस मॉडर्नाचा घेतला असल्याची माहिती देण्यात आली. सध्या मर्केल यांच्या या लसीकरणाची चर्चा सुरू आहे.

मर्केल यांच्या प्रवक्त्यांनी ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेला सांगितले की, मर्केल यांनी नुकताच करोना लशीचा दुसरा डोस घेतला आहे. हा डोस मॉडर्ना कंपनीने विकसित केलेल्या एमआरएनए लशीचा होता.

वाचा:करोना लसीकरण वेगात; पण अमेरिकेने घेतलाय ‘याचा’ धसका !

एंजेला मर्केल यांचे वय ६६ वर्ष असून त्यांनी पहिला डोस एस्ट्राजेनेका लशीचा घेतला होता. त्यांनी हा डोस १६ एप्रिल रोजी घेतला होता. त्यानंतर एस्ट्राजेनका लशीमुळे शरिरात रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याची तक्रार समोर आली होती. त्यावेळी जर्मनीलह काही युरोपीयन देशांनी एस्ट्राजेनका करोना लशीच्या वापरावर स्थगिती आणली. चौकशीनंतर एस्ट्राजेनका लस वापरास काही देशांनी परवानगी दिली. काही युरोपीयन देशांमध्ये ही लस ६० वर्षावरील नागरिकांना देण्यात येत आहे.

वाचा: करोनाच्या डेल्टासह इतर वेरिएंटवरही ‘ही’ लस प्रभावी!

वाचा: भारत सरकार-फायजरची चर्चा अंतिम टप्प्यात; लशीची ‘इतकी’ असणार किंमत?

जर्मनीसारख्या काही देशांमध्ये एस्ट्राजेनेका लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस फायजर-बायोएनटेक अथवा मॉडर्ना लशीचा देण्यात येत आहे. जर्मनीत आतापर्यंत ५१.२ टक्के लोकांना लशीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. तर, दोन कोटी ६३ लाख लोकांना करोना लशीचा दुसरा डोस मिळाला आहे.

वाचा: चिंता वाढली! डेल्टानंतर आता ‘या’ नव्या वेरिएंटचा धोका; २९ देशांमध्ये फैलाव

दरम्यान, दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लस दिल्यानंतरही लस प्रभावी ठरत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी दिली. डॉ. स्वामीनाथन यांनी सांगितले की, लसीकरण मोहिमेत दुसऱ्या कंपनीचा डोस देता येऊ शकतो. याआधी काही शास्त्रज्ञांनी करोनाच्या वेरिएंटचा मुकाबला करण्यासाठी दोन वेगवेगळ्या कंपन्यांची लस देण्याची सूचना केली होती. यामुळे वेरिएंटचा मुकाबला करण्यासाठी दीर्घकाळ सुरक्षा आणि रोगप्रतिकारक शक्ती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, दोन भिन्न लशी दिल्यानंतर दुष्परिणामही जाणवत आहे. जर्मनी, ब्रिटेन आणि स्पेनमधील आकडेवारीनुसार, दोन वेगळ्या कंपन्यांच्या लशी घेणाऱ्यांना ताप, अंगदुखी आणि अन्य साइड इफेक्ट्स दिसून आले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: