सेन्सेक्स-निफ्टीत घसरण; सेन्सेक्सने अनुभवला ६०० अंकाचा चढ उतार


मुंबई : भांडवली बाजारात आज सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजी-मंदीचा अनुभव घेतला. सकाळच्या सत्रात ३०० अंकांनी वधारलेला सेन्सेक्स बाजार बंद होताना २८२ अंकाच्या घसरणीसह स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीमध्ये ८५ अंकांची घसरण झाली.

बँंकांना दिलासा; मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सीच्या जप्त मालमत्तेतून झाली बंपर वसुली
आज दिवसभरात सेन्सेक्सने ५२९१२.३५ अंकांचा उच्चांकी स्तर गाठला. तर ५२२६४ अंकांपर्यंत खाली आला होता. अखेर ५२३०६ अंकावर स्थिरावला. आजच्या सत्रात सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी २२ शेअर घसरणीसह बंद झाले. ज्यात रिलायन्स, एसबीआय, सन फार्मा, डॉ. रेड्डी लॅब, टेक महिंद्रा, एचडीएफसी, आयटीसी, पॉवरग्रीड, इन्फोसिस या शेअरमध्ये घसरण झाली.

लस घेतलीय ; ही विमान कंपनी देत आहेत तिकिटावर सवलत
ऊर्जा क्षेत्रात टाटा पॉवर, अदानी पॉवर, एनटीपीसी, पॉवरग्रीड, एनएचपीसी , जेएसडब्ल्यू एनर्जी या शेअरमध्ये घसरण झाली. औषध निर्माण क्षेत्राला आज नफावसुलीचा फटका बसला. फार्मा क्षेत्रातील आरती इंडस्ट्रीज, अजंता फार्मा, स्ट्राइड्स फार्मा, बायोकॉन सुवेंन लाईफ हे शेअर घसरणीसह बंद झाले.

कमॉडिटी तेजीत; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
मूडीज या पत मानांकन संस्थेने चालू वर्षाच्या विकास दराचा अंदाज घटवला आहे. मुडीजने २०२१ मध्ये भारतचा विकासदर ९.६ टक्के राहील, असा सुधारित अंदाज वर्तवला. ज्यामुळे बाजाराचा नूर पालटला. गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा मारा सुरु केला परिणामी निर्देशांकात घसरण झाल्याचे शेअर दलालांनी सांगितले.

वाहन उद्योगात मात्र खरेदीचा ओघ दिसून आला. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, हिरो मोटो कॉर्प, मारुती सुझुकी, टीव्हीएस मोटर्स, बजाज ऑटो या शेअरमध्ये वाढ झाली. आज अदानी पोर्टच्या शेअरमध्ये घसरण झाली.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: