काँग्रेसचे माजी आमदार कांती कोळी यांचे निधन


हायलाइट्स:

  • माजी आमदार कांती कोळी यांचे निधन
  • गेल्या काही दिवसांपासून सुरू होते उपचार
  • कांती कोळी यांच्या निधनाने ठाणे जिल्ह्यात हळहळ

ठाणे: काँग्रेसचे माजी आमदार कांती कोळी यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी रात्री ठाण्यातील महागिरी कोळीवाडा येथील राहत्या घरीच निधन झाले. त्यांचे मृत्यूसमयी वय ७५ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले- सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

ठाण्याची नगरपालिका अस्तित्वात असताना कांती कोळी यांनी नगरसेवक पद भूषविले. १९८६ साली ठाणे महापालिकेची स्थापना झाली. यापूर्वी सन १९८० ते १९९० या कालावधीत ते काँग्रेस पक्षाचे सलग दहा वर्ष आमदार म्हणून निवडून आले होते.

Sameer Wankhede: समीर वानखेडे यांची सुरक्षा वाढवली; ‘त्या’ तक्रारीचीही चौकशी सुरू

ठाणे शहरात काँग्रेस पक्ष वाढवण्यात कांती कोळी यांनी हातभार लावला. तसंच त्यांना मानणारा शहरात काँग्रेसचा एक मोठा वर्ग आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खूप खालावली होती. ते उपचारालाही साथ देत नव्हते. अखेर गुरुवारी रात्री त्यांच्या राहत्या घरीच त्यांची प्राणज्योत मावळली.

दरम्यान, माजी आमदार कांती कोळी यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या घराकडे काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने धाव घेतली होती. शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: