vaccination in india : करोना लसीकरण मोहीम; १०० कोटी डोसचे लक्ष्य पूर्ण होताच विमानतळ, रेल्वे स्टेशवर होणार उद्घोषणा


नवी दिल्लीः करोनावरील लसीकरण मोहीमेत पुढच्या आठवड्यात १०० कोटींच्या ऐतिहासिक टप्पा गाठला जाईल. लसीकरण मोहीमेच्या या यशाची घोषणा बस स्थानकं, बंदरे, मेट्रो स्टेशन, विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या बसेसमध्ये केली जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली.

देश १०० कोटी लसीकरणाच्या टप्प्या जवळ आहे. आतापर्यंत ९७ कोटींहून अधिक करोनावरील लसीचे डोस देण्यात आले आहेत. ज्या दिवशी लसींचे १०० कोटी डोस देण्याचे लक्ष्य पूर्ण होईल, त्या दिवशी स्पाइसजेट आपल्या विमानांवर एक अब्ज लसीचे पोस्टर लावेल, ज्यात पंतप्रधान मोदी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचेही फोटो असतील.

CoWin वेबसाइटवर १०० कोटी डोस पूर्ण करण्यासाठी काउंटडाउन दिसेल. हे काउंटडाउन #VaccineCentury या नावाने दिसेल. १८ किंवा १८ ऑक्टोबरला लसीकरण मोहीमेत १०० कोटी डोस पूर्ण होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पुढील महिन्यापासून आरोग्य मंत्रालयाकडे आवश्यकतेपेक्षा जास्त लसीचे डोस असतील. या महिन्यात लसीचे सुमारे २८ कोटी डोस उपलब्ध होतील. ज्यात २२ कोटी Covishield आणि ६ कोटी covaxin असतील, असं आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

Covaxin: २ ते १८ वयोगटासाठी ‘कोव्हॅक्सिन’च्या आपात्कालीन वापराला मंजुरी

सुरवातीला शेजारी देशांना करोना लसीचा पुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती करोना लसींच्या निर्यातीबाबत अधिकाऱ्यांनी दिली. भारताने करोनावरील लसीचे डोस नेपाळ, बांगलादेश, म्यानमार आणि इराणला पाठवले आहेत, असं परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितलं.

“भारत करोनावरील लसींचा पुरवठा पूर्ववत करेल, असं पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत अलीकडेच सांगितलं होतं. यानुसार आम्ही शेजारी देशांना लसींचा पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: